फैजपूर (प्रतिनिधी) ‘तू माझ्या बहिणीसोबत का बोलतो?, असे म्हणत एका २३ वर्षीय तरुणाच्या मानेवर विळ्याने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस स्थानकात मयूर उर्फ दिगंबर जनार्धन तळेले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात जितेंद्र अनिल तळेले (वय २३ रा. बोरखेडा ता. यावल) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १२ जून २०२२ रोजी मयूर उर्फ दिगंबर जनार्दन तळेले (रा. न्हावी ता. यावल) याने तू माझ्या बहिणीसोबत का बोलतो?, मी तुला जिवंत ठेवणार नाही, असे बोलून जितेंद्रच्या मानेवर विळा मारून जबर दुखापत केली. याप्रकरणी फैजपुर पोलीस स्थानकात मयूर उर्फ दिगंबर जनार्धन तळेले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिद्धेश्वर अखेगावकर हे करीत आहेत.