TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहशतवाद प्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी जगाला दिला ; शिवसेनेने पाक पंतप्रधानांना फटकारले

The Clear News Desk by The Clear News Desk
July 30, 2021
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका वाक्यावरून देशात रान उठले आहे. त्याच वाक्यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी इम्रान खान यांना आजच्या सामना अग्रलेखातून चांगलेच फटकारले आहे. इम्रान खान यांनी दहशतवाद प्रेमाचा ढळढळीत पुरावा जगाला दिल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

बामियानमधील भगवान बुद्धाच्या मूर्ती स्फोटकांनी उडविणारे, बुरखा घातला नाही म्हणून महिलांचे गळे चिरून हत्या करणारे, किरकोळ कारणावरून आपल्याच नागरिकांवर गोळ्यांचा वर्षाव करणारे , क्रूर कत्तली व हत्याकांडे घडवून त्याचे व्हिडीओ जारी करणारे तालिबानी म्हणजे सज्जन नागरिक आहेत, असे इम्रान मियाँना वाटत असेल तर पाकड्यांच्या दहशतवादप्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी स्वतःच जगाला दिला आहे, अशी टीका राऊतांनी केली आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

अमेरिका अफगाणिस्तानातील आपले सर्व सैन्य माघारी घेत आहे आणि तिथे पुन्हा एकदा तालिबानी राजवट येण्याची चिन्हे दिसत असल्याने इम्रान खान यांना तालिबानप्रेमाचे भरते आले असावे. त्यामुळे ‘तालिबानी म्हणजे सर्वसामान्य नागरिक’ असे विधान इम्रान यांनी केले असावे. पण हे वक्तव्य म्हणजे दहशतवाद प्रेमाचा ढळढळीत पुरावा असल्याचं अग्रलेखात म्हटलंय. ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ अशी एक मराठी म्हण आहे. बेताल बडबडीसाठी कुप्रसिद्ध असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ही म्हण तंतोतंत लागू पडते. ‘तालिबानी लोक हे तर सामान्य नागरिक आहेत,’ असा दिव्य विचार इम्रान मियाँनी मांडला आहे.

अमेरिकेच्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी तालिबान्यांवर स्तुतिसुमने उधळली आणि अमेरिकेच्या चुकांचा पाढा वाचला. अफगाणिस्तानातील विद्यमान स्थितीबद्दल अमेरिकाच जबाबदार आहे. अमेरिकेने तालिबान्यांना योग्य प्रकारे हाताळले नाही, तालिबानी काही लष्करी पोषाखात नसतात हे अमेरिकेला समजले नाही आणि अमेरिकेमुळेच अफगाणिस्तानची परिस्थिती आज बिकट झाली, असा आरोप इम्रान यांनी केला. अमेरिकेच्या चुका जरूर असतील, परंतु जगभरातील अतिरेकी संघटनांचे आश्रयस्थान असलेल्या आणि दहशतवादाला कायमस्वरूपी रसद पुरविणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेच्या चुका दाखविण्याचा नैतिक अधिकार आहे काय, हा खरा प्रश्न आहे.

ज्या तालिबानने आजवर अफगाणिस्तानात हजारो निरपराध लोकांचे बळी घेतले, शेकडो हत्याकांडे घडविली ते तालिबानी राक्षस म्हणजे सर्वसामान्य लोक आहेत, हे इम्रान खान यांचे विधान म्हणजे या शतकातील सर्वात मोठा विनोद आहे. मुळात तालि बान काय चीज आहे हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. असे असताना तालिबानचे प्रवक्ते असल्याच्या थाटात इम्रान खान यांनी तालिबानची नसती ओळख करून देत स्वतःचेच हसे करून घेतले आहे. अर्थात कश्मीरमध्ये मारल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांचा ‘शहीद’ असा उल्लेख करणाऱ्या पाकिस्तान्यांकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार!

उलट तालिबानी म्हणजे अखिल विश्वाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर धाडलेले थोर संतमहात्मे व देवदूत आहेत, असा उल्लेख इम्रान मियाँनी केला नाही हे नशीबच म्हणायचे. आम्ही तालिबानचे समर्थक नाही किंवा पाकिस्तानने तालिबान्यांना आश्रय दिलेला नाही, असे दावे हजारेक वेळा तरी पाकिस्तानच्या पंतप्रधान व लष्करप्रमुखांनी आजवर केले असतील. मात्र, खुद्द पंतप्रधान इम्रान खान यांनी तालिबानचा कैवार घेऊन त्यांना निरागस ठरविण्यासाठी जी वकिली केली आहे, त्यामुळे पाकिस्तानने आजवर केलेले सर्व दावे तद्दन खोटे होते हे आपोआपच सिद्ध झाले.

अमेरिकेने ‘९/११’ च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानवर लष्करी कारवाई करून तालिबान्यांची राजवट उलथवून लावली, तेव्हापासून पाकिस्ताननेच तालिबान्यांना पोसले. अमेरिका आणि तालिबान यांच्यातील संघर्षात खुद्द पाकिस्तानचेही ७० हजारहून अधिक नागरिक मरण पावले, असे इम्रान खान यांनी याच मुलाखतीत सांगितले आहे. अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले घडवून तालिबानी अतिरेकी पाकिस्तानच्या गोधडीत दबा धरून बसत होते, म्हणून तर अमेरिकेने पाकिस्तानच्या हद्दीत हल्ले चढविले.

या हल्ल्यांत गव्हासोबत किडे रगडावेत तसे पाकिस्तानचे असंख्य निरपराध नागरिकही मरण पावले. एरवी भारताला विरोधात ऊठसूट अणुबॉम्बच्या पोकळ धमक्या देणाऱ्या पाकिस्तानने त्यांचे ७० हजार नागरिक मारल्याचा जाब अमेरिकेला का विचारला नाही, हा प्रश्नही उरतोच. तालिबान्यांचे पालनपोषण केल्यामुळेच पाकड्यांनी तोंड दाबून हा बुक्क्यांचा मार निमूटपणे सहन केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

टोकियो ऑलिम्पिक : 'शूट ऑफ'मध्ये दीपिका कुमारीनं गाठली उपांत्यपूर्व फेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

… अन् आमिष दाखवून मिळवलेला हा विजय : प्रवीण दरेकर

March 19, 2021

आता शिवसेना भवनासाठी मारमाऱ्या होतील : मंत्री गिरीश महाजन  !

September 26, 2022

अंडरवर्ल्ड दाऊदच्या साथीदारास पाटणा येथून अटक !

February 9, 2021

प्रेमात धोका : मूल झाल्यावर प्रेयसीला सोडून प्रियकर फरार, तरुणी रस्त्यावर !

July 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group