भुसावळ (प्रतिनिधी) तहसील कार्यालय हे संपूर्ण तालुक्याचे कामकाजाचे ठिकाण असल्याने दररोज नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते यात महिलांचा समावेश असतो. मात्र याठिकाणी प्रसाधनगृह आला कुलूप लागले असल्याने महिलांचे मोठे गैरसोय होत आहे.
शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी शासनाने पुरुषांसाठी व महिलांसाठी अशी दोन वेगळी प्रसाधनगृहे निर्माण केली आहेत. मात्र महिला प्रसाधनगृह नेहमी कुलूप लागलेले दिसून येते. तालुक्यातून आलेल्या महिलांना यामुळे प्रसाधनगृहाची गरज पडल्यास याचा वापर करता येत नाही. याची दखल संबंधितांनी घ्यावी अशी मागणी होत आहे तसेच या प्रसाधनगृहात मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नियमितपणे साफसफाई होत नसल्याचे चित्र आहे. येथील दुर्गंधीमुळे काही दिवसापूर्वी एक वृद्ध व्यक्ती चक्कर येऊन पडल्याची घटना घडली होती मात्र या ठिकाणी उभ्या असलेल्या नागरिकांनी लागलीच त्या व्यक्तीस उचलून बाहेर आणले होते. त्यामुळे तहसील प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत स्वच्छता करण्याचे गरज आहे.