जालना (वृत्तसंस्था) ओमीक्रोन व्हायरसचा महाराष्ट्रामध्ये तूर्तास तरी काही प्रभाव नसल्यामुळे चिंतेचे काही कारण नाही. मात्र, काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. तसेच शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा नवीन घातक ओमिक्रॉन व्हेरिएंट आता समोर आला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग वाढू नये, याकरिता कडक पावले उचलण्यात येत आहेत. त्यातच येत्या २ दिवसामध्ये राज्यात प्राथमिक शाळा सुरु होणार आहेत. यामुळे व्हेरिएंट आढळल्यावर शाळा सुरु होणार की नाही, यासाठी संभ्रम निर्माण झाला होता. परंतू शाळा ठरल्याप्रमाणेच १ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. ओमीक्रोन व्हायरसचा महाराष्ट्रामध्ये तूर्तास तरी काही प्रभाव नसल्यामुळे चिंतेचे काही कारण नाही. मात्र, काळजी घेणे अतिशय गरजेचे असल्याचे राजेश टोपेंनी यावेळी सांगितले आहे. ओमीक्रॉन व्हेरिएंटच्या पार्शवभूमीवर शाळा उघडण्याच्या निर्णयाविषयी निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. शाळेविषयी आरोग्य विभागाने परवानगी दिली असली, तरी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे राजेश टोपेंनी यावेळी सांगितले आहे. शाळा सुरू होण्याची आमची परवानगी आहे.
















