मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात रविवारी कोरोनाचे 326 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र गर्दी होत असून राजकीय मेळावे होत आहे. तरीही कोरोना रुग्णांची अपेक्षित वाढ नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आणि चौथ्या लाटेचीही शक्यता वाटत नाही, असं राजेश टोपे म्हणाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, कोरोनाचा आजचा आकडा पाहता 254 नवीन रुग्ण आहेत. रिकव्हरी 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. राज्यात कोवीडच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही. राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाही. राज्यात कोरोना रुग्ण वाढत नसून लसीकरणही चांगलं झालंय. राज्यात सध्या 1950 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. हा फार मोठा विषय नाही. सध्या सर्वत्र गर्दी होत असून राजकीय मेळावे होत आहे. तरीही कोरोना रुग्णांची अपेक्षित वाढ नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. आणि चौथ्या लाटेचीही शक्यता वाटत नाही. बूस्टर डोसबाबत केंद्राच्या सुचना आहे. त्यानुसार राज्यात बूस्टर डोस देण्यात येत आहेत. ॲंटीबॉडीजची टेस्ट करुन लोकांनी बूस्टर डोसबाबत निर्णय घ्यावा असे आरोग्यमंत्री म्हणाले.
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या सुचनेनुसार प्रत्येक भागातील पक्ष संघटनेला वेळ देतोय. इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय. त्यात आरोग्य विभागाशी संबंधीत प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आम्ही सर्वच शाह, फुले, आंबेडकर यांच्या विचाराचे आहोत. छत्रपती संभाजी राजे यांच्याबाबत आदर आहे. ते पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यांचे पवार साहेब यांच्याशी प्रेमाचे संबंध आहेत. त्यांच्याबाबत महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं राजेश टोपे यावेळी म्हणाले.