चाळीसगाव (प्रतिनिधी) अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये चाळीसगाव तालुक्यातील शिवसैनिक काम करीत असून शिवसेनेच्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेल्या निष्ठेने आपले अस्तित्व टिकून आहेत. चाळीसगाव तालुका शिवसेनेसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन आपण येथील शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सतत वेळ देऊ असे प्रतिपादन आज चाळीसगाव तालुका शिवसेनेच्या वतीने नवनियुक्त जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने यांच्या सत्कारासाठी आयोजित शिवसेना मेळाव्यात केले.
यावेळी डॉक्टर हर्षल माने यांचा चाळीसगाव तालुका व शहर शिवसेना शाखेतर्फे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांचा सत्कार यावेळी केला. आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीत तालुक्यातून पक्षाला घवघवीत यश मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी नियोजनबद्ध पद्धतीने जास्तीत जास्त काम करावे, असे आवाहन करतानाच पक्षात नवचैतन्य निर्माण होण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या देऊन संघटनात्मक बदल करण्याचे संकेतही त्यांनी दिलेत. यावेळी उपस्थित असलेल्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा ताई पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत असताना महिला आघाडीच्या सदस्यांची संख्या वाढवण्यासाठी शिवसैनिकांनी महिला पदाधिकाऱ्यांना सहकार्य करून त्यांना मदत करावी, असे आव्हान केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रोहिदास पाटील जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील तसेच तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे तुकाराम पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करून तालुका शिवसेने समोरील आव्हाने व समस्या तसेच संघटनेचे बळ याबाबत माहिती दिली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहर प्रमूख नाना कुमावत, भीमराव खलाणे, सुनील गायकवाड, संजय ठाकरे, प्रतिभा पवार, सविता कुमावत, अनिल राठोड, हिम्मत निकम, अनिल पाटील, वसीम चेअरमन रामेश्वर चौधरी, नाना शिंदे, जगदीश महाजन, सागर पाटील, चेतन कुमावत, विलास भोई व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते
शिवसेना प्रवेश
यावेळी नूतन जिल्हाप्रमुख यांच्या उपस्थितीत शिरसगाव येथील मनोज निकम, गणेश निकम, विजय निकम, अजय निकम, युवराज निकम, अलवाडी येथील प्रवीण देविदास, बागुल जिभाऊ, वना कोळी, अण्णाजी कोळी, समाधान प्रताप पाटील, जामडी येथील गजेंद्र परदेशी, महंमद शेख, रोकडे येथील भाईदास शेलार, भोरस येथील चिरागदिन इम्रान शेख आसिफ सय्यद यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुखपदी सविता कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली. असून त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र सातपुते यांनी केले.