मुक्ताईनगर (प्रतिनिधी) श्री संत मुक्ताबाई अंतर्धान स्थळ कोथळी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून या तीर्थक्षेत्रास एकनाथराव खडसे यांनी आपल्या मंत्री पदाच्या कार्यकाळात ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला आहे. तसेच त्यांनी तीर्थक्षेत्र विकास पर्यटन विकासाच्या माध्यमातून कोथळी टूरिझम संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्यासाठी या ठिकाणी अनेक कामे मंजूर करून आणली होती. त्यातून या परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे एम्फि थिएटर, टूरिस्ट इन्टेर प्रीटीशन सेंटर ,कल्चरल हॉल ,कँटीन आदी बांधकाम झाले आहेत. तसेच राज्याच्या ग्राम विकास खात्या तर्फे संत मुक्ताई मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे.
मुक्ताई मंदिरा जवळ तापी पुर्णानदीच्या संगमामुळे हतनूर जलाशयाचे बॅकवाटर उपलब्ध आहे ,मुबलक प्रमाणात नैसर्गिक पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असल्याने वॉटर स्पोर्टस करीता बांधकामे केल्यास मुक्ताबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविक आणि पर्यटकांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध होतील हि भूमिका एकनाथराव खडसे यांनी घेतली. त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले व प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत सन 2018 साली कोथळी येथे अम्युजमेंट पार्क मंजूर करून आणला.
एकूण अंदाजित 10 कोटी रुपये किंमतीचा हा प्रकल्प असून तत्कालीन पर्यटन मंत्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न होऊन पहिल्या टप्प्यातील एक एकरमध्ये 2018 पासून या पार्कच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यावेळी मंजुर 1 कोटी रुपये निधी मधून बरेचसे काम पूर्णत्वास आलेले आहे. परंतु मागील काही काळापासून निधी अभावी हे काम थांबले होते. त्या कामाला निधी मिळावा यासाठी एकनाथराव खडसे यांचा सतत पाठपुरावा सुरू होता त्यानुसार महाराष्ट्र शासनाने दि 14 डिसेंबर 2022 रोजी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत कोथळी येथील अम्युजमेंट पार्कला 4 कोटी 47 लाख 96 हजार निधी मंजुर केला आहे. यातून वॉटर पार्कमध्ये मल्टी लेन राईड ,ट्यूबन्डफ्लोट राईड , थंडर क्रुझ स्लाइड ,ओपन बॉडी स्लाइड ,टायफुल टनेल ,क्रुसेडर राईड करीता टायफुल टनेल, रेनबो टनेल असे विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध होणार आहे. यातून कोथळी मुक्ताईनगर येथे पर्यटन वाढीस चालना मिळणार आहे