लातूर (वृत्तसंस्था) सख्ख्या भावानेच आईच्या मदतीने लहान भावाच्या मदतीने खून केल्याची खळबळजनक घटना औसा तालुक्यातील तुंगी येथे रविवारी (दि.२८) घडली. याबाबत पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघं संशयितांना अटक केली आहे.
औसा तालुक्यातील तुंगी येथील आरोपी सचिन बालाजी जाधव हा तरुण रविवारी (दि.२८) औसा पोलीस ठाण्यात आला. आपला लहान भाऊ योगेश बालाजी जाधव (वय २३) याने शेतातील पत्र्याच्या शेडला गळफास घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचे म्हणणे ऐकून घेत सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. परंतु, त्याची देहबोली संशयास्पद वाटू लागल्यामुळे त्याची चौकशी सुरु करताच तो गडबडला, भावाने आत्महत्या केल्यानंतर त्याचे प्रेत मीच खाली काढल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा केला. यावेळी घटनास्थळावरील एकंदरीत परिस्थिती बघता पोलिसांना संशय आला. आत्महत्या केलेल्या जागी आणि मृतदेह ठेवलेली जागा वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी चौकशी सुरू करताच संशयित आरोपी सचिन जाधव याने गुन्ह्याची कबुली दिली. दारूच्या आहारी गेल्याने आपल्या लहान भावाने शेतात झाडाला गळफास घेतल्याचा बनाव रचत खून केला असल्याचे सांगितले.
पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावावर देहबोलीवरून पोलिसांना संशय आला. नंतर त्यानेच भावाचा खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. या प्रकरणी औसा पोलिसांत आई व मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई शशिकला बालाजी जाधव (वय ४७) आणि मुलगा सचिन बालाजी जाधव (वय २३) याला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. दारू प्राशन करून लहान भाऊ योगेश बालाजी जाधव हा घरात सर्वांना त्रास देत होता. त्याच्या या त्रासाला सर्वजण वैतागले होते.
शनिवारी (दि.२७) रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास तो पुन्हा घरात आला. त्याने पैशासाठी वाद सुरू केला. यावेळी शशिकला बालाजी जाधव व मोठा मुलगा सचिन यांनी मिळून दारूच्या नशेत असलेल्या योगेश याला शेतात नेले, आईच्या मदतीने सचिनने योगेशचा दोरीने गळा आवळून खून केला, असे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुरनं. ३०/ २४ कलम ३०२, ३३२३, १८२, ३४ भादवीअन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना लागलीच ताब्यात घेण्यात आले आहे.