अमरावती (वृत्तसंस्था) घरात कोणालाही न सांगता दोन १७ वर्षीय मित्र नवीकोरी दुचाकी घेऊन निघाले. परंतू थोड्याच वेळात दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खांचा डोंगर कोसळला आहे. रितेश ज्ञानेश्वर बाभुळकर (१७) आणि प्रज्ज्वल रामदास डाखोडे (१७, दोघेही रा. वाठोडा शुक्लेश्वर) असे अपघातात मृत्यू झालेल्या मित्रांची नावे आहेत
रितेशकडे काही दिवसांपूर्वीच नवीकोरी दुचाकी घेतली होती. दरम्यान १७ मे रोजी सकाळी रितेशने घरी कोणालाही न सांगता घरातून दुचाकी घेतली व चक्कर मारायला म्हणून खोलापूरला जायचे ठरवले. यावेळी त्याचा मित्र प्रज्वलही सोबत होता. दरम्यान खोलापूरहून परत गावी जाताना मार्गांतील नावेड गावाजवळ दुचाकी अनियंत्रित होऊन झाडावर धडकली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे दोघांनाही उपचारासाठी अमरावती व नंतर नागपूरला पाठवले. नागपुरात उपचार सुरू असताना २५ मे रोजी प्रज्वलचा, तर १२ जूनला रितेशचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे दोघांच्या कुटुंबीयांवर कुटुंबीयांवर दु:खांचा डोंगर कोसळला आहे.