धरणगाव (प्रतिनिधी) माहेरून ५ लाख आणले नाही म्हणून २५ वर्षीय विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच सासू सासऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात कल्याणी प्रशांत देवरे (वय २५, रा. शिरुड ता. जि. धुळे, ह.मु. चोरगाव ता. धरणगाव) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ जानेवारी २०२१ रोजी पासून ते दि. २१ जून २०२१ पर्यंत वेळोवेळी तुझ्या माहेरुन ५ लाख रुपये घेवुन ये. तर पैसे आणले नाही, या कारणासाठी प्रशांत भाऊसाहेब देवरे, भाऊसाहेब भगवान देवरे, सुशीला उर्फ आशाबाई भाऊसाहेब देवरे (सर्व कालिंका माता मंदिराजवळ शिरुड ता. जि. धुळे) यांनी विवाहितेस शिवीगाळ करुन चापटा बुक्यांनी मारहाण करुन वेळोवेळी मानसीक व शारिरीक छळ केला. एवढेच नव्हे तर विवाहितेस सासु, सासरे यांनी तुला मारुन टाकु अशी धमकी दिली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. अरुण निकुंभ करीत आहेत.















