यावल (सुरेश पाटील) नगरपरिषदेतर्फे १०० एमएलडी क्षमतेच्या अतिरिक्त साठवण तलाव निर्मितीचे १४व्या वित्त आयोगातून २ कोटी ८७ लाख रुपयाचे बांधकाम पूर्णत्वाकडे असल्याची माहिती साठवण तलावाच्या ठिकाणी यावल नगरपालिका पदाधिकार्यांनी भेट दिली त्यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली.
काल मंगळवार रोजी संध्याकाळी ५ वाजता यावल नगरपालिका सदस्यांनी यावल शहरापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या हतनूर धरणाच्या पाटाजवळ असलेल्या जुन्या साठवण तलावाच्या बाजूला नवीन साठवण तलावाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाणी करताना पत्रकारांना पुढील प्रमाणे माहिती दिली.
सन १९९९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे यावल शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी ३०० एमएलडी क्षमतेचा साठवण तलावाचे बांधकाम करण्यात आले होते आणि आहे. या साठवण तलावास पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याने साठवण तलावात मोठ्या प्रमाणात गाळ वाढला. त्यामुळे पाण्याचे लिकेज सुद्धा वाढले पर्यायी यावल शहराला ९० दिवस पुरेल एवढा पाणीपुरवठा होत होता तो फक्त ४५ ते ५० दिवसावर आलेला होता पर्यायी यावल शहराला हतनूर धरणातील पाणी सोडण्याच्या आवर्तनाची प्रतिक्षा करावी लागत होती. त्यामुळे समस्या लक्षात घेता आणि यावल शहराच्या पाणीपुरवठ्याच्या भवितव्याच्या दूर दृष्टिकोनातून जोपर्यंत नवीन साठवण तलावाचे बांधकाम होत नाही तोपर्यंत जुन्या साठवण तलावाची दुरुस्ती करता येणार नाही, हे लक्षात घेऊन यावल नगरपालिका माजी अध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील व त्यांच्या सर्व सहकारी नगरसेवकांनी शासनाकडे वेळोवेळी सतत पाठपुरावा करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून तांत्रिक मंजुरी मिळवून जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून प्रशासकीय मान्यता घेऊन नवीन अतिरिक्त साठवण तलावाचे बांधकाम करण्याची प्रक्रिया सुरू केली ते साठवण तलावाचे काम आज अंतिम टप्प्यात असल्याची तसेच आता साठवण तलावात १०० ते १२५ दिवस यावल शहराला पाणी पुरवठा होईल इतके पाणी साठवण केले जाईल त्यामुळे आता यावल शहराचा अंदाजे वीस ते पंचवीस वर्षापर्यंत पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. अशी सुद्धा माहिती यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी दिली.
यावेळी त्यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा. मुकेश येवले, माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते, नगरसेवक समीर शेख, यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते गणेश महाजन, डॉ. युवराज चौधरी, दिलीप वाणी, राजु फालक, गिरीष महाजन, एजाज पटेल/ देशमुख यांच्यासह आदी मान्यवर मंडळी उपस्थितीत होती.