जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ९५४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ४२५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – ३१०, जळगाव ग्रामीण-४२, भुसावळ- ७०, अमळनेर- १८, चोपडा-१२१, पाचोरा-१७, भडगाव-२१, धरणगाव-५७, यावल-३०, एरंडोल-९८, जामनेर-३१, रावेर-०९, पारोळा-०७, चाळीसगाव-७२, मुक्ताईनगर-३२, बोदवड-१५, इतर जिल्ह्यातील-०४ असे एकुण ९५४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ६७ हजार ६८० पर्यंत पोहचली असून ६० हजार ००५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १४२७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ६२४८ रुग्ण सध्या उपचार घेताय.
















