धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते. त्यांच्या हस्ते प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षक तथा बालभारती अभ्यास मंडळाचे माजी सदस्य बापू शिरसाठ यांनी प्रास्ताविकातून या नेत्यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक यू.एस.बोरसे, व्ही.एच.चौधरी, डी.एच.कोळी,कला शिक्षक आर.जी.खैरे, विज्ञान शिक्षक एस.पी. सोनार आणि नवनीत सपकाळे यांनी अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक बी.डी.शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कर्मचारी योगेश नाईक, मिलिंद हिंगोणेकर आणि जितेंद्र दाभाडे यांनी परिश्रम घेतले.