मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाकाळात परीक्षा न झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला आहे. दुपारी १ वाजता हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार होता. मात्र आता वेबसाइट क्रॅश झाल्याची माहिती मिळत आहे. साधारणतः १६ लाख विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. या निकालाची उत्सुकता असताना वेबसाइट क्रॅश झाली आहे.
http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in या डोब सेबसाइट्स वर निकाल जाहीर करण्यात येत होता. मात्र आता वेबसाईटचं क्रॅश झाल्याची माहिती मिळतेय. बोर्डाकडून मात्र अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र विद्यार्थ्यांना चिंता करू नये प्रयत्न करत राहावेत. घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे.
दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा रद्द करण्यात आली. मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने दहावीची संपूर्ण परीक्षाच रद्द करण्यात आली. दहावीच्या परीक्षेसाठी यंदा एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ९ लाख ९ हजार ९३१ विद्यार्थी तर ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थिनी होत्या.