चोपडा (प्रतिनिधी) वाघळी ता चाळीसगाव येथील छत्रपती शिवराय फौंडेशन संचालित यशवंत पब्लिक स्कूल या शाळेस शिक्षण सप्लाय अँण्ड फ्रेंचाईज एक्स्पो 2023 आणि शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने बिकेसी एमएमआरडीए ग्राउंड, मुंबई येथे बेस्ट स्कुल अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष परमानंद यशवंत सूर्यवंशी व प्राचार्या जयश्री सूर्यवंशी यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार मुंबई येथील एका खास कार्यक्रमात स्वीकारला. यशवंत पब्लिक स्कूल मध्ये ज्युनियर केजी ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जाते. शैक्षणिक गुणवत्ता,वैयक्तिक लक्ष,विविध संस्कारक्षम उपक्रम,हिरवागार परिसर आणि विविध उपक्रमांमुळे शाळेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.