यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर दोघ अल्पवयीन मुलांनी आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक असे की, २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच ते तीनच्या दरम्यान, अल्पवयीन पिडीत मुलगी शौचास गेली होती. याचवेळी दोघं अल्पवयीन मुलांनी पिडीत मुलीला जबरीने केळीच्या बागेत नेले. याठिकाणी दोघांनी पिडीतेवर आळीपाळीने बलात्कार केला. तसेच घडलेला प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी भादवि कलम ३५४ (अ), ३७६ (ड),३५४,३२३,२९४ तसेच बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा कलम ३/४ ५ (ग)/६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर या करीत आहेत. दरम्यान, दोघं संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली आहे.