यावल (प्रतिनिधी) शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरामागील झोपडपट्टीत आईच्या कडेवरील दीड वर्षांच्या बालकावर लांडगा सदृष्य हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला. बालकाला घेऊन पळ काढणाऱ्या बालकाची २० वर्षीय तरुणाने सुटका केली. मात्र, या झटापटीत बालक किरकोळ, तर तरूण गंभीर जखमी झाला. पण स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्याने हिंस्त्र प्राप्पाला ठार केले. दोन्ही जखमींवर चालला प्रथमोपचार करून जळगाव हलवले.
बावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या पाठीमागे स्मशानभूमीच्या रस्त्यावर आदिवासी झोपडपट्टी आहे. येथे गोलू मनोज भील हा दीड वर्षीय बालक आपल्या आईजवळ होता. यावेळी तेथे आलेल्या लांडगा सदृष्य हिंस्त्र प्राण्याने अचानक हल्ला चढवला. महिलेजवळील बालकास पळवले. हा प्रकार पाहताच योगेश अनिल भिल (वप २०) याने लांडग्याचा पाठलाग करून बालकास त्याच्या तावडीतून सोडवले. यामुळे हिंस्त्र झालेल्या लांडग्याने योगेशवर हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्याने हिंस्त्र प्राण्यास ठार केले.
नंतर जखमी अवस्थेमधील योगेश व दीड वर्षीय गोल यांना सदाशिव भील, रवींद्र वाघ, विवेक अडकमोल, करण भील, किरण भील, विकास भील बारकू भील, मनोज भील यांनी यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, योगेशची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव येथे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय य रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. यावेळी जखमींना वन विभागाने मदत द्यावी, अशी मागणी झाली.