मुंबई (वृत्तसंस्था) टीव्ही सिरीयल ‘रिश्ता क्या कहलाता है’ ची अभिनेत्री दिव्या भटनागरचे आज मुंबईत निधन झाले. दिव्या मागील ११ दिवसांपासून निमोनिया, कोरोनाव्हायरस आणि हायपरटेंशनमुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती.
दिव्याच भाऊ देवाशिष यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काही दिवसांपूर्वी आम्ही दीदीला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले होते. दीदींच्या तब्येतीमध्ये कोणताही सुधार झालेला नव्हता. आज सकाळी कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले. इतरही करणे आहेत परंतु योग्य वेळ आल्यानंतर याविषयी बोलेल.” दिव्याने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत गुलाबोची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय ‘तेरा यार हूं मैं’ , ‘उडान’, ‘जीत गई तो पिया मोरे’ आणि ‘विष’ यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये देखील तिने काम केले आहे. दिव्या गेल्या काही दिवसांपासून दिव्याची प्रकृती गंभीर असून ती झुंज देत होती. त्यानंतर सोमवारी सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. ती ३४ वर्षांची होती. दिव्याला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर तिला गोरेगाव येथील एसआरव्ही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिव्या भटनागर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘गुलाबो’ यांसारख्या टीव्ही मालिकांमधून घराघरांत पोहचली होती.
दिव्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर न्युमोनिया झाला होता. त्यानंतर तिची प्रकृती खालावत गेली. तिचा ऑक्सिजन लेव्हलही कमी होत गेली होती. त्यामुळे तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. व्हेंटिलेटरवर गेल्या अनेक दिवसांपासून ती झुंज देत होती. अखेर तिची ही झुंज अपयशी ठरली आहे.