मुक्ताईनगर (प्रतिनिधी) जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे (Eknathrao ?Khadse) यांच्या कन्या रोहिणीताई खडसे (Rohinitai Khadse) यांच्यावरील हल्ल्यामुळं जळगाव जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या हल्ल्यामागे नेमकं काय कारण असेल?, याबाबत तर्कवितर्क लढविले जात होते. परंतू रोहिणी खडसेंनी अवैध धंद्यांच्या बाबत गृहमंत्री (Home Minister )आणि पोलिसांकडे (Jalgaon Police) दिलेल्या तक्रारीच्या रागातून त्यांच्यावर हल्ला झाल्याची खळबळजनक माहिती आता समोर आली आहे.
अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलीसांना तसेच गृहमंत्र्यांना निवेदन दिल्याचा रागातून हल्ला
रोहीणी प्राजंल खडसे खेवलकर (वय-३९, धंदा- गृहीणी, रा. संत गजानन महाराज मंदीरा जवळ मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत गुन्ह्याचे कारण नमूद केले आहे. त्यानुसार बोदवड नगर पंचायतचे निवडणुकीचे प्रचारादरम्यान धक्काबुक्की झाल्याने तसेच दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याचा तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविद्र भैया पाटील व रोहिणी खडसे यांनी आरोपी क्र.१ यांचे अवैध धंदे बंद करणे बाबत पोलीसांना तसेच गृहमंत्री साहेबांना निवेदन दिल्याचा राग हे गुन्ह्याचे प्रमुख कारण देण्यात आले आहे. दरम्यान, अवैध धंदे बंद करण्याच्या प्रमुख मागणीतून हा हल्ला झाल्याचे समोर आल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. कारण गुन्हेगारांचे मनोबल किती उंचावलेले आहे, हे या घटनेतून समोर येत आहे. जर एकनाथराव खडसे यांच्या सारख्या मातब्बर नेत्याच्या मुलीवर हल्ला होऊ शकतो, तर तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांचे काय ?, असा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
असा झाला होता हल्ला
रोहिणी खडसे या त्यांची फॉच्युर्नर गाडी क्रमांक (एम.एच.१९ सी.सी १९१९) ने चांगदेव येथून कोथळी मार्गे मुक्ताईनगर येथे येत होते. त्यावेळी सुतगिरणी सुमारे १ किमी. अंतररावर राहील अशा ठिकाणी आरोपींनी रोहिणी खडसे यांची गाडी अडवून हातात लोखंडी रॉड, पिस्टल, तलवार असे हत्यार घेवून त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने गाडीवर हल्ला चढविला. यावेळी आरोपींनी गाडीचे समोर काचा व गाडीचे बोनट फोडून नुकसान केले.
ही आहेत आरोपींची नावे
१) छोटू भोई २) सुनिल काशिनाथ पाटील दोघे रा. मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर जि.जळगाव ३) पंकज कोळी रा. चांगदेव ता. मुक्ताईनगर जि.जळगाव व इतर अनोळखी ०४ ईसम तर या गुन्ह्यात पिस्टल, लोखंडी रॉड, तलवार, अशी घातक शस्त्र वापरण्यात आली होती.
या कलमान्वये दाखल झालाय गुन्हा दाखल
भादवि कलम 307,341,427,141,143, 147, 148, 149, महा. पो. अधि. ३७(१) (३) चे उल्लघंन १३५ प्रमाणे, आर्म अॅक्ट ३(२५), ४(२५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनि प्रदीप शेवाळे हे करत आहेत.