अमरावती (वृत्तसंस्था) अमरावतीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावती जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीला चक्क पेढ्यातून गुंगीच औषध देऊन, तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पीडिता तिच्या मामाच्या गावाला असताना आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर १२ जूनच्या रात्रीला तिला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर आरोपींनी चारचाकीमध्ये पीडितेच्या अब्रुचे लचके तोडले. दरम्यान, या घटनेनं पीडित मुलगी प्रचंड घाबरली. भेदरलेल्या परिस्थितीत तिने परतवाडा पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक अत्याचार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच दोन नराधमांना अटक देखील करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.