साकळी ता. यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील साकळी गावात महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याबाबत आरोपी आणि फिर्यादी यांनी परस्पर एकामेकांविरूद यावल पोलिसात फिर्याद दाखल केली असुन घटनेमुळे गावात तणावपुर्ण शांतता निर्माण झाली आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की, साकळी या गावातील भोई वाडयात राहणारा गौरव पुरूषोत्तम माळी (वय २५ वर्ष) यांने याच परिसरात राहणारी एक महिला ही रात्री ७ वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर धूतलेल्या तांदुळाचे पाणी फेकण्यास गेली असता या आरोपी गौरव माळी यांने महिलेचे हात पकडुन तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले असून कुणास सांगितल्यास तुला जिवे ठार मारेन अशी धमकी दिली अशी फिर्याद महिलेने यावल पोलीसात तक्रार दाखल केली. तर दुसऱ्या फिर्यादीत गौरव पुरूषोत्तम माळी याने म्हटले आहे की, गावातील राहणारे सद्दाम रसुल पिंजारी, बाबा शाहरूख रा. ग्रामपंचायत जवळ साकळी, तौसीफ गुलाम शेख , रा.अक्सानगर साकळी, अल्लाउद्दीन शेख रा .भोईवाडा, साकळी, आदील गॅरेजवाला व अल्तमश ईकबाल शेख रा. भोईवाडा साकळी यांनी बेकाद्याशीर मंडळी जमवुन संगनमताने फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडुन त्यास बेदम मारहाण केली, अशी फिर्याद दिली. पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी या घटनेचा तपास करीत आहे.