चंद्रपूर (वृत्तसंस्था) एका मुंबईच्या तरुणीने सध्या सर्वांची झोप उडवित आहे. मुंबईची असल्याची बतावणी करीत तरूणी व्हिडिओ कॉलकरून अश्लिल चाळे करत तरूणांना धमकी देऊन खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोंडपीपरी तालुक्यातील एका पीडित वकिलाने याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे.
आधी एका अनोळखी मुलीचा व्हाट्सअँपवर हॅलो मॅसेज येतो. DP वर सुंदर मुलीचा फोटो असतो आणि सुंदर मुलीचा मॅसेज बघून तरुण मुलं असो किंवा इतर कोणी पुरुष त्याने त्या मॅसेजचा रिप्लाय दिला की मग सुरू होते मैत्री, अश्लील व तरुणांना उत्तेजित करणारे मॅसेज. यानंतर व्हिडीओकॉल करून अश्लील हावभाव करुन तरूणांना घायाळ करीत स्वत: निर्वस्त्र होऊन तरूणाला देखील निर्वस्त्र होण्यास भाग पाडते. त्यानंतर हा व्हीडिओ कॉल रेकार्ड करून त्याचा वापर तरूणांकडून पैसे उकळण्यासाठी केला जातो. दरम्यान, तरुणी एवढ्यावरच थांबत नाही तर तिचे सहकारी पोलीस असल्याची बतावणी करीत संबंधित तरुणांना कॉल करतात आणि तरूणीने तक्रार दाखल केल्याचे सांगतात आणि संबंधित व्यक्तीकडून पैशाची मागणी करतात.
दरम्यान, या प्रकरणात अनेक तरूण अडकले आहेत. चंद्रपूर येथील गोंडपिपरी तालुक्यात अश्या तरूणांचा आकडा मोठा असल्याचे बोलले जात आहे. बदनामीचा भीतीने तरूणांनी पोलिसांकडेही पाठ फिरविली आणि तरुणीला पैसे दिले असल्याचं समजतं आहे. या प्रकाराने तरूण मुलं मानसिकरीत्या खचून जात आहेत. अश्यात गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गावातील वकील तरूणाने गोंडपिपरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा छडा पोलीस कसा लावणार याकडेच आता पीडित तरुणांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. गोंडपिपरीत तक्रार दाखल झाल्याने आता अनेक तरुण हळूहळू पुढे येऊ लागले आहेत. दरम्यान, या तरूणीने जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांनाही गंडविल्याची चर्चा आहे.