जळगाव (प्रतिनिधी) लव्ह जिहादच्या संशयावरुन तरुणीला सोबत घेवून फिरणाऱ्याला टोळक्याने बेदम मारहाण केली. तसेच संतप्त जमावाने त्या तरुणाची दुचाकी पेटवून दिल्याची घटना दि. ११ रोजी मोहाडी रोड परिसरात घडली. दरम्यान, पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत जमावाच्या तावडीतून तरुणाची सुटका करीत त्याला पोलीस ठाणयात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
भुसावळ तालुक्यातील राहणारे तरुण -तरुणी सोबत महाविद्यालयात शिक्षण घेतात. ते दोघे दुचाकीने शहरातील मोहाडी रोड परिसरात फिरत होते. त्यावेळी ते एका दुकानावर थांबले असता काही तरुणांनी त्यांची चौकशी केली. यावेळी संशयास्पदरित्या फिरणारा तरुण हा त्यांच्यासोबत अर्वाच्य भाषेत त्यांच्यासोबत बोलत होता. काही वेळानंतर हा तरुण परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याने लव जिहादच्या संशयावरुन काही तरुणांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली.
संतप्त जमावाने पेटवली दुचाकी
लव जिहादच्या संशयावरुन तरुणाला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणाची दुचाकी देखील पेटवून दिल्यानंतर ती दुचाकी पुर्णपणे जळून खाक झाली. मनपाच्या अग्शिमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला आणि त्यांनी पेटवलेली आग विझवली.
आठ ते दहा जणांना घेतले ताब्यात
उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासाह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी गेल्यानंतर त्यांनी संतप्त जमावाला शांत केले. त्यानंतर आठ ते दहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम सुरु होते.
















