वरणगाव (प्रतिनिधी) येथील आयुध निर्माणी वसाहतमधील टाईप टू क्वार्टर नंबर २७ मधील रहिवासी अजय दिलीप मतकर (वय २०) याने आपल्या रहात्या घरात पंख्याला साडी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रोजी दुपारी ३:१५ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की अजय मतकर यांची आई वरणगाव आयुध निर्माणीत नोकरीस असून तो आईसोबत सदर युवक राहत होता . तसेच मुक्ताईनगर येथील आय टीआय मध्ये तो शिकत आहे दुपारच्या सुमारास आई ड्युटीवर गेलीं असताना त्याने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला आणि त्याचा मृत्यू झाला .आईने घरी आल्यानंतर पाहिल्यानंतर सदर घटना उघडकीस आली आत्महत्येचे कारण समजू शकले नाही वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे व त्याचे शव वरणगाव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविले आहे, वरणगांव पोलीस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यू सी आर पी सी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे .