जळगाव (प्रतिनिधी) शहरापासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या शिरसोली येथे एकाने नैराश्यातून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्याचे काम सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र यशवंत उर्फ कडू वाघ (वय ४०) असे मृताचे नाव असून हे काल दि.२० रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेच्या पासून घरातून बाहेर शौचास गेले होता. रात्रभर घरी न आल्याने घरातील लोकांनी त्याची शोधाशोध सुरु केली होती. तथापि, आज सकाळी ९ वाजता शिरसोली प्र.न. गावालगत आकाशवाणी केंद्राच्या मागील गट न.६०८ भागवत रामदास ताडे यांच्या मालकीच्या शेतात बंटी गोपाल ताडे हा आलेला असता यावेळी त्याला विहिरीत रवींद्र वाघ हा तरंगताना दिसला. यावेळी बंटी याने सदर घटना शेतमालक भागवत ताडे याला सांगितले. शिरसोली प्र.न. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच, तात्काळ घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे राजेंद्र ठाकरे, निलेश भावसार दाखल झाले. मृत युवकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.