भुसावळ (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात खुनांच्या सलग घडणाऱ्या घटनांत आणखी एक धक्कादायक घटनासमोर आली. भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास किरकोळ वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ पोलिसांनी केवळ काही तासांत संयुक्त कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक करून प्रकरणाचा यशस्वी पर्दाफाश केला आहे. मृत तरुणाचे नाव जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) हातमजुरी करून आपल्या पत्नी व तीन मुलांसोबत उदरनिर्वाह करणाऱ्या जितेंद्र साळुंखे यांचा अत्यंत शांत स्वभाव होता. अशा व्यक्तीचा एका किरकोळ वादातून खून झाल्याची घटना अत्यंत वेदनादायक असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत तपासाला सुरुवात केली.
खूनातील तिघे काही तासातच एलसीबीकडून जेरबंद
या दोघांना अटक केली. प्राथमिक चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, भुसावळ शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी स्वतंत्र पथक तयार करून तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला. दीपक वसंत शंखपाळ (रा. कंडारी) याला अटक करण्यात यश आले. या खूनप्रकरणाचा तपास भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून, गुन्ह्यामागील नेमकं कारण, आरोपींच्या पार्श्वभूमी आणि इतर संदर्भातील माहिती पुढील तपासात उघड होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवणारी ही घटना सध्या चर्चेचा विषय बनली असून, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
घटना कशी घडली ?
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र साळुंखे हे जळगाव शहरातील तीन परिचित व्यक्तींसोबत एका खासगी कामानिमित्त कंडारी येथे गेले होते. रात्री एका हॉटेलमध्ये मद्यपान सुरु असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वाद काही क्षणांतच तीव्र चकमकीत बदलला आणि तिघा आरोपींनी धारदार शस्त्राने जितेंद्रवर हल्ला केला. जखमी अवस्थेत त्याला भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
















