चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टैंड परिसरात १८ डिसेंबरला मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून हा गोळीबार झाला आहे.
या घटनेत शहरातील रोहिदास रामू कोळी (वय ३०) हा तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी संशियत पसार झाला आहे. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्याकडून घटनेची माहिती घेण्यात आली. दरम्यान, जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचे समजते. दरम्यान, रोहिदास कोळी या तरूणावर एका संशयिताने गुन्हा
दाखल केल्याचा राग मनात ठेवून गोळी झाडण्यात आली. ही गोळी रोहिदासच्या मांडीला लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. जखमीला पोलिसांनी तातडीने उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात हलवले. जून महिन्यात रोहिदासने संशियताविरोधात भादंवि ३२४चा गुन्हा दाखल केला होता. हाच राग मनात असल्याने संशयिताने रोहिदास समोर दिसताच पुन्हा वाद उकरून काढत गोळी झाडल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. तर घटनास्थळी पाहणी करुन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले आहेत. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण माहिती मिळाली नाही. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश माळी करत आहेत.
या कारणावरून घडली घटना
जखमी रोहिदास कोळी आणि सुवर्णाताई नगरमधील संशयित दीपक सुभाष मरसाळे या दोंघामध्ये गत ५ महिन्यापूर्वी वाद झाला होता. या वादातून दीपक मरसाळे याने रोहिदासवर चाकूने वार करत जखमी केले होते. त्यातच काल रोहिदास पवार हा त्याच्या मित्रासोबत स्टेशन रोडवरील भिंतीवर सिगारेट पित असतांना रात्री ११.४५ सुमारास दीपक मरसाळे मित्रासोबत आला. त्याने रोहिदासकडे पाहून आता सापडला असे म्हणत त्याच्यावर बंदूकीतून गोळी झाडली. तर रोहिदास आणि त्यांचे मित्र पळत असतांना रोहिदासच्या पायावर गोळी लागून तो जखमी झाला.















