धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जांभोरा गावातील तरुणांनी शिवराणा प्रतिमा स्थापन करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्याकडे केली. यावेळी युवा सैनिकांनी प्रतापराव पाटील यांच्याशी शिवराणा प्रतिमा विषयी चर्चा केली. त्यावर जागा सुचवा प्रतिमा स्थापन करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे आश्वासन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी दिले.
जांभोरा गावाचे माजी ग्रामपंचायत भगवान मराठे यांचे निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबाला भेट देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आले होते. यावेळी त्यांनी कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. यानंतर गावातील युवा सैनिकांनी प्रतापराव पाटील यांची भेट घेतली आणि शिवराणा प्रतिमा स्थापन करण्याविषयी चर्चा केली. शिवराणा प्रतिमा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांची एकत्रित प्रतिमा करण्याची मागणी यावेळी युवा सैनिकांनी केली. यासाठी प्रतापराव पाटील यांनी तात्काळ प्रतिमा स्थापन करण्याचे आश्वासनही दिले आहे. एवढेचे नव्हे तर जागा सुचवा प्रतिमा स्थापन करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही प्रतापराव पाटील यांनी सांगितले. तसेच गावातील रंगमंचाजवळील जागेची प्राथमिक पाहणी देखील केली.
यावेळी चर्चा करताना युवासेना विभाग प्रमुख शुभम चौहान, राजेंद्र बिसेन, संजय कोळी, अर्जुन मोहिते, पंकज बिऱ्हाडे, अमोल सोनवणे, रवींद्र मोहिते, वालीव पाटील, प्रवीण पाटील, सुरेश पवार, अमोल कोळी, पिंटू पाटील, प्रवीण चव्हाण, राहुल कोळी, सागर हटकर, समाधान भील, दिलीप पवार आदी उपस्थित होते.