धरणगाव (प्रतिनिधी) आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर विश्वास दाखवून धरणगाव शहरातील युवकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, या प्रवेश सोहळ्यामुळे कॉंग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.
प्रवेश करणाऱ्या तरुणांमध्ये रवि महाजन, सुनील बिरले, ज्ञानेश्वर महाजन, भैया महाजन या युवकांचा समावेश होता. यावेळी काँग्रेस तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रतिलाल चौधरी, जिल्हा सरचिटणीस सम्राट परिहार, शहर अध्यक्ष राजेंद्र न्हायदे, तालुका उपाध्यक्ष चंदन पाटील, दीपक जाधव, मनोज कंखरे, विजय जनकवार, गौरंग पटेल, रामचंद्र माळी, विकास लांबोळे, गोपाल पाटील, ओबीसी सेलचे तालूका अध्यक्ष प्रमोद जगताप, युवक शहर अध्यक्ष गौरवसिंग चव्हाण, उपाध्यक्ष राहुल मराठे, योगेश येवले, शिवा महाजन राजेंद्र ठाकूर, शुभम शुक्ल यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.