लाहोर (वृत्तसंस्था) लश्कर ए तोयबाचा कमांडर आणि २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी उर रहमान लख्वीला टेरर फंडिंगप्रकरणी पाकिस्तानातील न्यायालयाने १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. टेरर फंडिंगसंबंधीत एका प्रकरणात लख्वीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. लाहोरच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने शुक्रवारी म्हणजेच आज लख्वीला ही शिक्षा ठोठावली आहे.
मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड, लश्कर-ए-तोयबाचा ऑपरेशनंन्स कमांडर, दहशतवादी जकीउर रहमान लखवीला १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणी पाकिस्तानमधील लाहोरच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. गेल्याच आठवड्यात टेरर फंडिंग प्रकरणी जकीउर रहमान लखवीला पाकिस्तानात अटक करण्यात आली होती. डिस्पेन्सरीच्या नावावर पैसा जमा करून त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने आज कोर्टाने त्याला १५ वर्षांची शिक्षा सुनावली. २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा लख्वी हा मास्टरमाइंड आहे. लाहोरमध्ये लख्वीविरोधात टेरर फंडिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो डिस्पेंसरीच्या नावाखाली पैसे गोळा करत होता आणि त्या पैशांचा वापर दहशतवादी कृत्यांसाठी करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हा पैसा वापरण्यात येत होता.
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये हल्ले झाले होते. या हल्ल्यात १६६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ३०० लोक जखमी झाले होते. जकीउर रहमना लखवी हा या हल्ल्याचा मास्टरमाइंड असून त्याचा मुंबई पोलीस शोध घेत होती. भारत सरकारने त्याला सप्टेंबर २०१९मध्ये यूएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित केलं होतं. तर UNSC मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. २६/११च्या हल्ल्याच्या तपासात लखवीनेच हाफिज सईदला मुंबई हल्ल्याचा कट रचून दिल्याचं उघड झालं होतं.
संयुक्त राष्ट्रांनी देखील जकी उर रहमान लख्वीला दहशतवादी घोषित केले होते. मात्र, त्याच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याने तो बिनधास्त फिरत होता. मात्र, काळ्या यादीत जाण्याची भीती असल्याने पाकिस्तानने एफएटीएफच्या (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) बैठकीपूर्वी लख्वीला अटक केली आहे.