भुसावळ (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीची छेडखानी करणारा आरोपीला बाजारपेठ पोलीसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे.
बाजार पेठ पोलीस स्थानकात ९०३/२०२० भादवी कलम ३५४-अ सह बालकांचे लैगींक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम-८ प्रमाणेचा गुन्हा २२ ऑक्टोबर रोजी दाखल होता. या गुन्ह्यातील फरार आरोपीची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार संशयित आरोपी नामे कैफ खान सलीम सलीम खान उर्फ कानपुरी (वय-१८, रा.नसरवंजी फाईल सैलानी बाबा दर्ग्याजवळ भुसावळ) हा चाळीसगाव परिसर भागातून सापळा रचून ताब्यात घेत त्याला रविवारी मध्यरात्री अटक केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.अनिल मोरे,सहा.पो. नि.मंगेश गोटला, पो.ना. समाधान पाटील, रमण सुरळकर, किशोर महाजन, उमाकांत पाटील, पो.काॅ.विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख, सचिन चौधरी, चेतन ढाकणे, योगेश महाजन, सुभाष साबळे अशानी केली असून पुढील तपास सहा. पो.निरीक्षक अनिल मोरे, पो.ना.समाधान पाटील हे करीत आहेत.