TheClearNews.Com
Thursday, July 3, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खासदार उन्मेष पाटील यांच्यासह निकटवर्तीयांकडून कोट्यवधी रुपयांची फसवणुकीचा आरोप ; जालन्याच्या उद्योजकाचा पोलिसात तक्रारी अर्ज !

ईडी, सीबीआय मागे लावायची धमकी देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचाही आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2024
in गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) चाळीसगाव भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर अडचणीत सापडले आहेत. खासदार उन्मेश पाटील यांच्यासह त्यांचे मेहुणे प्रशांत राजेंद्र वाघ, सनदी लेखापरीक्षक (सीए), प्रमोद नरहरी जाधव (पुणे) व रामेश्वर भानुसे यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरातील बेगमपुरा पोलीस ठाण्यात उद्योगपती संजय मोहनराव सिनगारे (वय 50, रा.पाणीवेस, जालना) यांनी लेखी तक्रार दिल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

ईडी, सीबीआय मागे लावण्याची धमकी

READ ALSO

बचत गटाचे पैशांबाबत विचारणा केल्याने चौघांकडून मारहाण

मद्य परवान्याच्या नावाखाली 9 लाखांची फसवणूक !

प्रसिद्ध उद्योजक तथा फिर्यादी संजय सिनगारे यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत अनेक गंभीर बाबींचा उहापोह करण्यात आला आहे. प्रामुख्याने त्यात नमूद आहे की, खासदार उन्मेष पाटील, त्यांचे मेव्हणे प्रशांत वाघ, सीए जाधव व त्यांचे मावसभाऊ रामेश्वर भानुसे यांनी सिनगारे बंधुंनी बोली लावून विकत घेतलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील श्रीनिवासा प्रोटीन प्रा.लि. (पूर्वीची रसोया प्रोटीन प्रा. लि.) या कंपनीत गोड बोलून व विविध आश्वासने देऊन संचालक म्हणून प्रवेश मिळवला तसेच कंपनीच्या खात्यातून बळजबरीने हात उसनवारीच्या नावाखाली वेळोवेळी 3.50 कोटी रूपये हे सीए जाधव यांच्या वडिलांच्या नरहरी जाधव यांच्या खात्यात वर्ग करून घेतले. तसेच, या कंपनीचे कर्ज मंजूर होण्यापूर्वी व युनीट चालू करण्याकरिता लागलेला खर्च 10.50 कोटी रूपये हा आम्ही नंतर तुम्हाला देऊ, असे सांगितले परंतु पैसे मागितले असता देणार नाही, असे सांगून काय करायचे ते करा, असे धमकावल्याचा आरोप आहे. शिवाय ईडी, सीबीआय मागे लावायची धमकी देऊन पैसे देण्यास टाळाटाळ चालवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

धमक्या देत केली दमदाटी
एवढेच नाही तर वेळोवेळी तीन कोटी रुपयांची रक्कम खासदार साहेबांना लागते आहे, असे सांगून कंपनीतून काढून घेतली. या पैशाचीही मागणी केली असता, सिनगारे बंधुंसह संचालकांना धमक्या देऊन दमदाटी केली व पैसे दिले नाहीत. तसेच, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकार्‍यांना ा हाताशी धरून कंपनीच्या संचालक पदाच्या कोऱ्या राजीनामापत्रावर सह्या देण्यास धमकावले, कंपनीतील शेअर्स रक्कम 20 कोटी रुपये मला रोख स्वरूपात द्या, मी ती तुम्हाला फिवरून देतो, म्हणजे तुमचा व कंपनीचा काही संबंध राहणार नाही, असे बजावले. तसेच, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील शासकीय विश्रामगृहावर शिविगाळ, दमदाटी करून धमक्या दिल्यात, अशा आशयाची फिर्याद संजय मोहनराव सिनगारे यांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. 2 मार्च रोजी पोलिसांनी तक्रारी अर्ज स्वीकारला असून प्रकरण चौकशीवर असल्याचे कळते. दरम्यान, या सर्व आरोपांवर खासदार उन्मेष पाटील नेमकं काय उत्तर देतात?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

बेगमपुरा पोलिसात देण्यात आलेली तक्रार जशीच्या तशी !

प्रती,
माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बेगमपुरा पोलीस ठाणे,
औरंगाबाद पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद.

विषय : जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील, त्यांचे मेव्हणे (बहिणीचे पती) प्रशांत राजेंद्र वाघ, चार्टर्ड अकाउंटंट प्रमोद नरहरी जाधव पुणे व जाधव यांचे मावस भाऊ रामेश्वर भानुसे यांनी एकमताने व अत्यंत नियोजन बद्ध रित्या, सुरवातीपासूनच फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या श्रीनिवासा प्रोटीन प्रा.ली. या कंपनीत संचालक म्हणून प्रवेश मिळवून, त्यांचे कडून कंपनीच्या खात्यातून बरजबळीने हातउसनवारीच्या नावाने वेळोवेळी रक्कम रु.३.५० कोटी, जाधव यांचे वडील नरहरी जाधव यांच्या खात्यात वर्ग करून घेतले. तसेच सदरील कंपनीचे कर्ज मंजूर होणेपूर्वी, युनिट चालू करण्याकरिता लागणारा खर्च रु. १०.५० कोटी इतका खर्च, आम्ही नंतर देतो असे सांगून व भासवून तसा खर्च करण्यास भाग पाडून नंतर तो खर्च आम्ही देणार नाही तुम्हाला आमचे काय करायचे ते करून घ्या. तसेच आमच्यावर वेळोवेळी दबाव आणून कंपनीच्या रोख रकमेतून वेळोवेळी अंदाजे रक्कम रु. ३ कोटी रोख स्वरुपात खासदार साहेबांना लागते आहे असे सांगून काढून घेतली, उपरोक्त पैशांची मागणी केली असता मला व इतर संचालकांना धमकी दिली व स्टेट बँक नागपूर शाखेचे अधिकारी यांना हाताशी धरून, कंपनीच्या संचालक पदाचा कोन्या राजीनामा पत्रावर सही देण्यास धमकावले व आमचे कंपनीतील शेअर्स रक्कम रु.२० कोटी मला रोख स्वरुपात द्या व मी ती तुम्हाला फिरवून देतो म्हणजे तुमचा व कंपनीचा काहीही संबंध राहणार नाही. या बाबतीत येणे प्रमाणे फिर्याद.

महोदय,

१) तक्रारदार नामे संजय मोहनराव सिनगारे, वय ५० वर्ष, व्यवसाय उद्योग, राहणार पाणीवेस, काद्राबाद, जालना मी वरील पत्यावर माझे कुटुंबीय व काका यांच्या सहित एकत्रित कुटुंबासारखे, मागील २० वर्षापासून रहात आहोत. आमचा २० वर्षापासून श्री. बालाजी उद्योग या नोंदणीकृत भागीदारी संस्थेमार्फत तेलबिया खरेदी करणे व खाद्यतेलाच्या निर्मितीचा उद्योग आहे. सदरील भागीदारी संस्थेत मी स्वतः माझे काका मनोहर जगन्नाथराव सिनगारे व माझे बंधु गिरीष, अनुज, व माझा चुलत भाऊ विनोद असे सर्वे भागीदार आहोत.

२) डिसेंबर २०२० मध्ये मलकापूर जि. बुलढाणा येथील रसोया प्रोटीन ली. या कंपनीचे सोल्वंट एक्सट्रॅक्शन प्लांट हा कर्ज वसुली पोटी अवसायाना द्वारे विक्रीस काढण्यात आलेला होता. या बाबतची माहिती आम्हास AAA INSOLVENCY PROFESSIONALS LLP याची माहिती आमचे व्यावसायीक व्हॉटस ग्रुप वरून मिळाली.

सदरील LLP फर्म चे कार्पोरेट भागीदार व रिझोल्युशन प्रोफेशनल श्री. अनिल गोयल चार्टर्ड अकाउनतंट यांच्या शी आम्ही संपर्क केला असता त्यांनी ऑनलाइन ई-ऑक्शन मध्ये सहभागी होण्याबाबत सूचित केले.

३) त्यानुसार आम्ही दि.१३ डिसेंबर २०२० रोजी सदरील विक्रीस काढलेल्या फॅक्टरीचे तसेच प्लांट व मशिनरी चे निरीक्षण करण्याकरिता त्यांचे उपरोक्त पत्यावरील साईट वर गेलो. आम्ही सदरील व्यवसायमध्ये अनेक वर्षापासून असल्यामुळे, ऐकून प्रोजेक्ट ची फिजीबीलिटी योग्य वाटल्याने सदरील फॅक्टरी च्या ई-ऑक्शन मध्ये भाग घेण्याचे ठरवले. तदनंतर श्री. बालाजी उद्योग भागीदारी संस्था यांच्या वतीने रु. ९६ लाखाचे ई.एम.डी. अमाउंट ऑनलाईन पद्धतीने जमा केली व ई-ऑक्शन मध्ये भाग घेतला. आमचे फर्म ची श्री. बालाजी उद्योग यांची बोली सर्वोच्च १९ कोटी ३९ लाख इतकी असल्याने ती स्वीकारण्यात आली.

४) दरम्यानच्या काळात आमचे जावई श्री. योगेश ज्ञानेश्वर चौधरी यांचे घरी चाळीसगाव येथे गेलो असता तेथे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. उन्मेष भैय्यासाहेब पाटील यांच्या शी भेट झाली. त्यानंतर त्यांनी आम्ही औरंगाबाद मार्गे जालना येथे जात असल्यामुळे त्यांचे कन्नड रोड स्थित, उमंग गोल्ड या जिनिंग व प्रेसिंग प्रकल्पास भेट देण्याबाबत आग्रह धरला. त्यांच्या आग्रहास मान देऊन श्री. बालाजीचे भागीदार श्री. मनोहरराव जगन्नाथराव सिंनगारे यांनी त्यांचे सदरील काम चालू असलेला परंतु अपूर्ण अवस्थेत असलेल्या प्रकल्पास भेट दिली. दरम्यान गप्पांचे ओघात त्यांनी आमचे कडून आम्ही करत असलेल्या उद्योग व्यवसायाची माहिती घेतली व म्हणाले की, राजकारण हे खूप अस्थिर असते मी देखील एखादा नवीन उद्योग व्यवसाय करावयास मिळतो का याच्या शोधात आहे. तसेच सरकार दरबारी म्हणजेच केंद्रात मी सत्ताधारी पार्टी चा खासदार असल्याने माझे खूप वजन आहे मी तुम्हाला खूप मदत करू शकतो असे सांगितले त्यांची गोड बोलून पटवून सांगण्याच्या पद्धतीस व भूलथापांना बळी पडून आम्ही त्यांच्यावर तातकाळ विश्वास ठेवला व आम्ही ई-ऑक्शन द्वारे विकत घेत असलेल्या मलकापूर येथील श्री. रोसोया प्रोटीन प्रा.ली. या प्रकल्पाबद्दल माहिती दिली. त्यावर त्यांनी तात्काळ प्रस्ताव ठेवला की त्यांनाही या उद्योग व्यावासात आमचे बरोबर काम करण्यास संधी मिळाली तर ते उपकृत होतील. आम्ही त्यांच्या ह्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला व आपल्यालाही उद्योग व्यावसायाकरीता एक केंद्रात वजन असणारी व्यक्ती भागीदार मेहणून मिळेल ह्या भाबड्या आशेने राजकीय पाठबळ मिळेल त्यांना ह्या नवीन प्रकल्पाबद्द्दल माहिती दिली.

५) तदनंतर आम्ही NCLT मधून वर वर्णन केल्याप्रमाणे मलकापूर येथील रसोया प्रोटीनन्सचा सोल्वंट एक्सट्रॅक्शन प्रकल्प विकत घेतला. परंतु त्यानंतर खासदार उन्मेष पाटील हे आमच्याशी वारंवार आमचे मोबाईल वर फोन करून सारखा संपर्क करत होते व त्यांनी मलकापूर येथील प्रोजेक्ट ला भेट देण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांना प्रोजेक्ट च्या साईट वर आम्ही घेऊन गेलो. तेथे मात्र त्यांनी काहीही करा व मलाही तुमच्या बरोबर ह्या व्यवसायात भागीदार/संचालक म्हणून घ्या अशी अक्षरश: हात पाय जोडून विनंती केली व आम्ही त्यांच्या या विनंतीने भारावून गेलो व त्यांना व्यवसायात बरोबर घेण्याचे ठरविले व त्यांनी आमची ओळख पुणे स्थित चार्टर्ड अकाउंटंट श्री. प्रमोद नरहरी जाधव यांच्याशी करून दिली आपल्याला पुढे व्यवसायात कर्ज व निधी उपलब्ध करून घेणे कामी व इतर तत्सम कामांसाठी चार्टर्ड अकाउंटट ची गरज भासेल, श्री. जाधव यांची लवकर कर्ज मिळवून निधी उभारण्याच्या बाबतीत हातखंडा असून त्यांची आपणास मदत होईल त्यामुळे त्यांनाही संचालक म्हणून नेमण्याचे ठरले. दरम्यान आम्ही सदरील प्लांट च्या आवारात बालाजी चे सुंदर व देखणे मंदिर असल्याने व आमची त्यावर श्रद्धा असल्याने आम्ही श्रीनिवासा प्रोटीन प्रा.ली. अशी नवीन कंपनी स्थापन केली त्या कंपनीत संचालक म्हणून श्री. अनुज मनोहरराव सिनगारे ५५%, शिवम संजय सिनगारे १५%, खासदार उन्मेष भैय्यासाहेब पाटील ५% व प्रमोद नरहरी जाधव २५% यांना घेतले. NCLT ला विनंती करून विक्री प्रमाणपत्र त्या कंपनीच्या नावे घेतले.

६) CA जाधव हे कंपनीचे संचालक झाल्या नंतर त्यांनी कर्ज मिळवणे कामी कुठलेही मदत केली नाही किंबहुना कंपनीचे डायरेक्टर बनणे पूर्वी त्यांनी व खासदार पाटील यांनी आम्हाला असे खोटे भासविले होते. त्यानंतर आम्ही सदरील कंपनीच्या व्यवसायावृद्धी साठी कर्ज मिळणेकामी आम्ही आमचे स्तरावर व आमचे हितसंबंध वापरून ICICI, HDFC व SBI या बँकानकडे खेळते भांडवलाची मागणी केली. परंतु कंपनीत राजकीय व्यक्ती म्हणजेच खासदार उन्मेष पाटील हे संचालक असल्याने कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे खासदार उन्मेष पाटील यांनी मी कंपनी संचालक पदाचा राजीनामा देतो व माझ्या ऐवजी माझे मेव्हणे, बहिणीचे पती श्री. प्रशांत राजेंद्र वाघ यांना संचालक म्हणून घ्या असे सांगितले त्या प्रमाणे खासदार पाटील यांचा राजीनामा स्वीकारून त्यांच्या जागेवर त्यांचा मेव्हण्याची वर्णी लावली.

७) आमचे कंपनीची बोली उच्चतम असल्याने आम्हास सदर युनिट NCLT कडून ताबा व विक्री प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, सदरील युनिट हे अनेक वर्षापासून बंद असल्याने त्याला पूर्व स्थितीत आणण्याकरिता कंपनीस मोठ्या रकमेची आवश्यकता होती, त्यानुसार आम्ही खासदार उन्मेष पाटील व CA जाधव यांच्या वाटे व हिश्यास येणाऱ्या रकमेची मागणी केली असता त्यांनी ती उपलब्ध करून देण्यासाठीची असमर्थता दर्शविली. खासदार पाटील यांनी चक्क सांगितले कि माझ्याकडे आता पैसे मागू नका तुम्ही तुमची जी अॅडजेस्टमेंट करायची ती करा माझ्याकडे वारंवार पैशाचा तगादा लावू नका. परंतु प्लांट पूर्व स्थितीत आणण्याकरिता त्याचा मेंन्टेनन्स करणे अवश्यक होते, त्याकरिता विविध कामांसाठी कॉन्टॅक्टर नेमलेले होते मशीनरीच्या मेंटटेनन्स करिता दक्षिण भारतातील कॉन्ट्रॅक्टर नेमलेले होते नवीन स्टोरेज, पूर्ण प्लांट ची रंगरंघोटी, लेबर निवासस्थान इतर सिव्हील कंन्सट्रक्शन कामगारांचे मासिक वेतन विविध प्रकारचे सरकारी लायसन्स प्राप्त करणे, जसे कि, FSSAI, HEXANE, FACTORY, MSEB लाईन, MPCB, APMC पनन लाईसन्स, विक्री प्रमाणपत्र नोंदण्या करिता स्टॅम्प ड्युटी चा खर्च इ. करीताचा खर्च हा दरम्यानच्या काळात म्हणजेच CC लिमिट च्या स्वरुपात कर्ज रूपाने खेळते भांडवल प्राप्त होण्यापूर्वी करण्यात आलेला होता तो खर्च अंदाजे सुमारे १०.५० कोटी इतका झालेला आहे. सदरील झालेला खर्च हा आम्ही आमच्या इतर फर्म मधून रकमा वेळो वेळी घेवून भागवलेला आहे. याची संपूर्ण माहिती व जाणीव खासदार पाटील, वाघ व जाधव यांना आहे. सदरील खर्चास वेळोवेळी सर्व संचालकांनी वेळोवेळी मान्यता दिलेली होती व आहे. तसे नसते तर इतर संचालक प्रशांत वाघ व CA जाधव यांनी वेळीच त्या बाबतीती तक्रार केली असती किंवा जाब विचारला असता परंतु आज पर्यंत या बाबतीत त्यांनी कुठे तक्रार केलेली नव्हती व नाही. सदर ची रक्कम आज पर्यंत प्रशांत वाघ व CA जाधव यांनी परत दिलेली नाही त्या बाबतीत वारंवार त्यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती रक्कम देण्यास टाळा टाळा केलेली असून, तुम्हाला काय कमी आहे तुम्ही पैशाने गब्बर झालेला आहात, तुम्ही आमचे पैशे भरले तर तुम्हाला काही फरक पडत नाही, तुम्हाला खासदार साहेबांचे ओळखीमुळे राजकीय व सरकारी स्तरावर प्रोटेक्शन मिळते आहे त्याचे मोल नाही. आमच्यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो आहे असे सांगून सदरील रक्कम देण्यास सपशेल नकार दिलेला आहे. आम्ही त्यांना सांगितले कि, आम्ही अनेक वर्षापासून तेलबियाणपासून तेल काढण्याचा उद्योग करीत आहोत आमचा व्यवसाय हा संपूर्ण कायदेशीर आहे त्यामुळे खासदार साहेबांच्या राजकीय वलयाचा आम्हाला फायदा होतो हे म्हणने चुकीचे आहे. कारण अश्या प्रकारे फसवणूक करण्याचा उद्देश, संगनमत व नियोजन हे अत्यंत चालाकीने सुरवातीपासूनच खासदार पाटील प्रशांत वाघ व CA जाधव यांनी केलेले होते. त्या नियोजन बध्द कटाचा भाग म्हणूनच त्यांनी आम्हास हा खर्च करण्यासाठी भरीस पाडले व खर्च करून घेतल्यानंतर व उत्पादन प्रक्रिया चालू केल्यानंतर त्यांनी सदरील पैसे परत देण्यास नकार दिलेला असून पैशांचा तगादा लावला असता खासदार उन्मेष पाटील यांनी आम्हाला वेळोवेळी धमक्या दिलेल्या आहेत कि माझी राज्य व केंद्र सरकार मध्ये मोठी ओळख आहे मी तुमची ED, CBI ची चौकशी लावून टाकेल नाहीतर कुठल्यातरी खोट्या गुन्ह्यात गोवून टाकेल.

८) त्यानंतर कारखाना सुरळीत चालू झाल्यानंतर मात्र खासदार उन्मेष पाटील यांनी आपली वागणूक पूर्णपणे बदलवली व आमच्या वर वारंवार दबाव आणण्यास सुरुवात केली व ते वेळोवेळी बेहिशोबी पैश्याची मागणी करू लागले. त्यांच्या या बेकायदेशीर मागणीमुळे आम्ही चक्राऊन गेलो व आम्ही विरोध केला असता त्यांनी आम्हाला सरळ सरळ धमक्यांचे सत्र चालू केले. त्यानंतर CA जाधव व खासदार उन्मेष पाटील यांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सरफेसी कायद्यान्वये विक्री काढलेला फैजपूर स्थित मधुकर सहकारी साखर कारखाना खरेदी करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी इंडिया बायो अॅन्ड अॅग्रो पेसिफिक प्रा.ली या कंपनी मार्फत टेंडर भरले त्या कंपनीत संजय धनकवडे व रामेश्वर भानुसे(CA जाधव यांचे मावस भाऊ) हे संचालक आहेत, खासदार उन्मेष पाटील जरी कंपनीत संचालक नसले तरी त्यांचा अनाधीकृत पने त्या कंपनीत शेअर आहे व ते कंपनी मध्ये घोस्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. परंतु त्याकरिता त्यांचे कडे भांडवलाची उपलब्धता नसल्याने खा. पाटील यांनी आमचे वर दबाव आणून कंपनीचे भांडवलातून रक्कम ३ कोटी ५० लाख हे CA जाधव यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या प्रोपरायटरशिप फर्म च्या नावे म्हणजेच लक्ष्मी नरसिंह ट्रेंडर्स, प्रोपरायटर नरहरी जाधव यांचे खात्यात हस्तांतरित केले. सदरील रकमेचे हस्तांतरण हे वेळो वेळी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत झालेले आहे. त्यानंतर देखील खासदार उन्मेश पाटील यांनी आमचेवर दबाव आणून मला अजून १६ कोटी उपलब्ध करून द्या असे धमकावले आम्ही त्यांच्या धमकी कडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी CA जाधव यांचे मावस भाऊ रामेश्वर किसनराव भानुसे यांना कंपनीचे व्यवहारासाठी आवश्यक असणारा OTP देण्यास मज्जाव केला. सदरील रामेश्वर भानुसे हे CA जाधव यांच्या वतीने कंपनीच्या दैनंदिन कामात लक्ष घालत होते म्हणून बँक खाते ऑपरेट करणे कामी ज्या दोन संचालकांचा बँकेच्या व्यवहाराचे अधिकृती करिता OTP लागतो त्यात कंपनीचे संचालक शिवम संजय सिनगारे व सदरील रामेश्वर भानुसे यांचे नंबर बँकेच्या दप्तरी अधिकृत करण्यात आलेले होते.

अश्या प्रकारे भानुसे यांनी OTP देण्यास टाळा टाळा केल्याने कंपनीचे सर्व बँकिंग व्यवहार हे ठप्प झालेले होते व त्यामुळे कंपनीचे खात्यावर उभी असलेली देणी वेळेत देणे शक्य होत नव्हते, त्यात, पुरवठादार, धनको, कृषी उत्पन्न बाजार समिती फीज, GST इ. खासगी व वैधानिक देणी थकलेली होती व त्यांनी त्यांचे पैशांकरिता तगादा लावला त्यामुळे आमचा वैयक्तिक व कंपनीची प्रतिष्ठा पणास लागली कारण सदरील पुरवठादार व इतर वैधानिक देणी ही आम्ही आमच्या २० वर्षाच्या व्यावसायीक कालावधीत नेहमी वेळेत अदा केलेली होती. ह्या फॅक्टरी व्यतिरिक्त आमचे ह्या स्वरूपाचे इतर देखील व्यवसाय आहेत व त्या मुळे सदरील लोकांबरोबर असलेले अनेक वर्षांचे व्यावसायीक संबंध धोक्यात आलेले होते. त्यामुळे आमचे समोर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. या बाबतीत आम्ही दि. २३ एप्रिल २०२३ रोजी रामेश्वर भानुसे यास ई-मेल करून त्यांनी OTP न दिल्याने बँकिंग व्यवहारात वरील प्रमाणे अडचण उभी राहिले याबाबत माहिती दिली परंतु सदरील बाब ही आमचे कडून बेकायदेशीर पैशेवसूल करणेकरिताची खासदार पाटील व CA जाधव यांनी आखलेल्या एका सुनियोजित व योजनाबद्ध कटाचा भाग असल्याने त्यांनी त्या कडे साफ दुर्लक्ष केले. शेवटी देणेदारांचा तगादा वाढल्याने आम्ही कंपनी कायद्याखालील अपेक्षित असलेली कायदेशीर प्रक्रिया राबवून कंपनीचे जालना मर्चेंट कॉ. ऑप बँकेत नवीन खाते उघडून त्या खात्यातून देणेदारांची, खासगी व वैधानिक देणी वेळो वेळी दिली. खरे पाहता आम्हाला अडचणीत आणून व व्यवसाय बंद पडून आमच्याकडून बेकायदेशीर रीत्या खंडणी वसुली करण्याकरिता खासदार उन्मेष पाटील यांनी अत्यंत नियोजन बद्ध रीत्या त्यांचे मेव्हणे प्रशांत वाघ व CA जाधव यांच्याशी संगनमत करून सुनियोजित असा कट रचलेला होता व तो या कटाचाच एक भाग होता.

शेवटी आम्हास ह्या सुनियोजित कटाची माहिती व जाणीव झाल्यानंतर आम्ही स्टेट बँकेला विनंती करून OTP साठी रामेश्वर भानुसे यांचे नावे असलेली अधिकृतता कंपनी कायद्यान्वये अपेक्षित असलेली कायदेशीर प्रक्रिया राबवून रद्द केली व त्यांचे ऐवजी OTP साठी, शिवम सिनगारे यांचे सोबत अनुज सिनगारे यांचे नाव दिले.

९) अश्या प्रकारे त्रास देवूनही आम्ही खासदार पाटील व CA जाधव यांच्या बेकायदेशीर पैश्याच्या मागणीस बधलो नाही. त्यामुळे खासदार पाटील हे आमच्यावर प्रचंड चिडलेले होते. त्यांनी अनेक वेळा आम्हाला शिवीगाळ देखील केली त्यामुळे आम्ही वैतागून अनिच्छेने सदरील कंपनीत विक्री करण्याचे ठरविल व ब्रोकरशी या बाबत चर्चा केली असता कर्जाच्या दायत्वासहित सदरील युनिट हे १०५ कोटीस विक्रीस जाईल असे ब्रोकर ने संबंधित पार्टीशी बोलून सांगितले. याची माहिती खासदार उन्मेष पाटील व CA जाधव यांना झाली व त्यांनी आम्ही धमकावले कि तुम्हाला हे युनिट चालवायचे नसेल तर ही कंपनी माझ्या हवाले करा, तुमच्या कडे अशी अनेक फर्मस आहेत तुम्ही पैश्याने खूप माजलेला आहात तुम्हाला पैश्याची गरज नाही.

१०) त्यानंतर, खासदार पाटील व CA जाधव हे त्यांच्या ठरलेल्या कटाप्रमाणे कंपनी बळकवणेसाठी सक्रीय झाले व त्यांनी बालाजी उद्योग चे पार्टनर श्री. मनोहर जगन्नाथराव सिनगारे यांचा भ्रमणदूरध्वनी वर प्रशांत वाघ यांनी फोन केला. तसेच संजय मोहनराव सिनगारे यांचे भ्रमणदूरध्वनी क्रमांक ९४२२७२२६८८ खासदार उन्मेष पाटील यांचा साधारणतः रात्री ९.३० वाजता त्यांचा भ्रमणदूरध्वनी क्र. ७७५७९५२०१४ वरून फोन आला व त्यांनी सांगितले की आपल्याला २६ जानेवारी २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे स्टेट बँकेचे DGM सोबत आपल्याला फॅक्टरी च्या कर्जाबरोबर चर्चा करावयाची आहे. आपण छत्रपती संभाजीनगर येथे दुपारी २ वाजे पर्यंत पोहचा असे सांगितले मरंतु, मी ऐनवेळेस अशा कारे मीटिंग ला येऊ शकत नाही कारण माझे मुंबईतील

कामाची वेळ मी अगोदरच ठरवलेली आहे. पस्तु मी माझे काका, भाऊ व मुलास त्या मीटिंग ला छत्रपती पोहचा असे सांगितले परंतु, मी ऐनवेळेस अशा प्रकारे मीटिंग ला येऊ शकत नाही कारण माझे मुंबईतील कामाची वेळ मी अगोदरच ठरवलेली आहे. परंतु मी माझे काका, भाऊ व मुलास त्या मीटिंग ला छत्रपती संभाजीनगर येथे २ वाजे पर्यंत पाठवण्याची तजविज करतो. त्यानुसार, माझा मुलगा शिवम, काका मनोहरराव, भाऊ विनोद असे आम्ही सर्व छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी तयार असता, प्रशांत वाघ यांचा दुपारी १४:२५ वाजता व्हॉट्सअप मॅसेज आला त्यात छत्रपती संभाजीनगर येथील लोकेशन टाकण्यात आलेले होते, शुभम याने त्यास १४:२६ मिनिटांनी ओके केले, परंतु सदरील १४:२५ मिनिटांनी लोकेशन चा मॅसेज त्यांनी डीलिट करून टाकला, व पुन्हा परत १५:१७ मिनिटांनी नवीन मॅसेज टाकला व त्यात लिहले कि, “Location Change Hovu Shakt” मग शिवम ने त्याच्या व्हॉट्सअप १५:१८ मिनिटांनी सलग ३ शॉर्ट मॅसेजस् पाठवले, “पाठवून द्या”, “आम्ही रस्त्यात आहे. त्या मॅसजला प्रशांत वाघ यांनी १५:४६ मिनिटांनी “Ok”, “20 min location takto” त्यानंतर प्रशांत यांनी १६:३३ मिनिटांनी त्यांचे व्हॉट्सअप वरून “सुभेदारी शासकीय विश्रामगृहाचे छत्रपती संभाजीनगर” चे लोकेशन टाकले. मग त्या प्रमाणे आम्ही संध्याकाळी साधारणत: ४, ४:३० वाजता पोहचलो.

तेथे पोहचल्यानंतर आम्ही गेस्ट हाऊस मधील सूट मध्ये गेलो तेथे खासदार उन्मेष पाटील त्यांचे मेव्हणे प्रशांत वाघ, CA जाधव, त्यांचा मावस भाऊ रामेश्वर भानुसे व नागपूर स्टेट बैंक IFB शाखेचे अधिकारी मनोज गायकवाड हे उपस्थीत होते. आम्ही तेथे पोहचून बसे पर्यंत सदरील बँक अधिकारी गायकवाड यांनी मनोहरराव सिनगारे यांना आरडाओरडा करून दम दिला कि, तुम्हीं कंपनीत संचालक नाही तुम्ही मध्ये बोलू नका. नंतर गायकवाड यांनी आरडाओरडा करून शिवराळ भाषा वापरण्यास सुरुवात केली व सांगितले कि, तुमचे कर्ज थकलेले आहे, तुम्ही फ्रॉड केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना जेल मध्ये जाव लागेल तुम्ही हे प्रकरण लवकरात लवकर सेटल करा. परंतु, त्यानंतर खासदार उन्मेष पाटील व CA प्रमोद जाधव यांनी देखील अरेरावीची भाषा वापरून आम्हाला दम दिला कि, तुम्हाला माझी केंद्रातील पोहच माहिती नाही मी तुमच्या मागे ED, STATE EOW व CBI चे शुक्लकाष्ट लावून टाकेल, तुम्हाला बरबाद करून टाकेल असा दम भरत असताना अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरली. त्यानंतर प्रशांत वाघ यांनी अगोदरच तयार करून आणलेले कंपनीचे राजीनाम्यासाठीची पत्रे व इतर कागदपत्र जसे कि, भाग हस्तांतरण अर्ज इ. आमचे समोर ठेवले व सगळ्यांनी आमच्यावर दबाव आणला व त्यावर तत्काळ सह्या करा संपूर्ण कंपनीचे नियंत्रण व कंपनी आमचे नावे हस्तांतरित करा व येथून चालते व्हा आम्ही त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आम्ही तेथून कशीबशी सुटका करून घेतली परंतु प्रशांत वाघ यांनी सूटच्या बाहेर येऊन आम्हास पुन्हा सज्जड दम भरला कि, ८ बाजे पर्यंत कागदपत्र सही करून घेऊन या नाहीतर आम्ही तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार देणारच आहोत. त्यानंतर बाहेर येवून बँकेचे अधिकारी गायकवाड यांनी देखील दम दिला कि, खासदार पाटील सांगतात त्या प्रमाणे करा अन्यथा तुम्हाला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. असे सांगून ते खासदार पाटील यांचे वाहनात बसून निघून गेले. त्यानंतरही त्यांचे मेव्हणे प्रशांत वाघ हे वेळोवेळी फोन करीत आहेत आम्ही त्यांचा फोन उचलत नाही.

तरी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील, त्यांचे मेव्हणे प्रशांत वाघ, पुणे येथील CA जाधव, व त्यांचे मावस भाऊ रामेश्वर भानुसे यांनी सुरवातीपासूनच म्हणजे त्यांचा कंपनीत संचालक म्हणून शिरकाव झाल्यानंतर फसवणुकीच्या उद्देशाने व अत्यंत नियोजनबद्धरीत्या कट रचून, सुरवातीलाच कर्ज मंजूर होण्यापूर्वीचा व युनिट चालू स्थित आणण्याकरीताचा खर्च आम्ही नंतर देवू असे भासवून व त्यावर आम्हास विश्वास ठेवण्यास भाग पाडून, रक्कम रु.१०.५० कोटी खर्च करण्यास भाग पाडले, व नंतर तुम्हाला पैश्यांची काय गरज आहे तुम्ही पैश्यांनी गब्बर आहात, तुम्हाला खासदार पाटलांचा राजकीय व सरकारी स्तरावर फायदा होतो आहे आम्ही त्याची कधी रॉयल्टी तुमच्या कडे मागितली का?. तुम्ही आमच्या हिश्याच्या पैशाची मागणी करू नका व ते पैसे विसरून जा तसेच वेळोवेळी म्हणजे १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत रक्कम रुपये ३.५० कोटी ही खासदार उन्मेष पाटील यांच्या सांगण्यावरून व दबावाखाली CA जाधव यांच्या वडिलांच्या नावे असलेल्या प्रोप्रायटरशिप फर्म च्या नावे म्हणजेच लक्ष्मी नरसिंह ट्रेंड्स प्रोप्रायटर नरहरी जाधव यांच्या खात्यात हस्तांतरित केले. सदरील रकमेची हिशोबात मागणी केल्यावर खासदार पाटील व CA जाधव यांनी त्यांच्या वतीने कंपनीत दैनंदिन कारभार बघणारे त्यांचे मावस भाऊ रामेश्वर भानुसे यास OTP देण्यास मज्जाव करून कंपनीचे दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प करून, आमचे वर दबाव आणला व तुम्ही कंपनी आहे त्या स्थितीत सोडून चालले जा. त्यांना वैतागून आम्ही हे युनिट विक्री करावयाचे ठरविले व ब्रोकर मार्फत हे युनिट दायित्वासहित १०५ कोटी रुपयास विक्री होत आहे हे कळल्यावर खासदार पाटील हे आमच्यावर खूप भडकले व त्यांनी २६ जानेवारी २०२४ रोजी आम्हाला औरंगाबाद येथे सुभेदारी या सरकारी गेस्ट हाऊस वर बोलावून अत्यंत शिवराळ भाषा वापरून संचालक पदाचा राजीनामा द्या व कंपनी आमच्या हवाले करा असे धमकावले, तसेच बँकेचे अधिकारी गायकवाद यांनी देखील तुम्ही खासदार पाटील सांगतात त्या प्रमाणे वागा नाहीतर मी तुमच्यावर बँकेचे फसवणूक केली म्हणून गुन्हे दाखल करेल तुम्हाला आम्ही जेल मध्ये सडवू, तसेच खासदार पाटील यांनी तुमची अनेक व्यावसाईक लफडी आहेत मी तुमच्या मागे ED व CBI ला लावतो तुमच उर्वरित आयुष्य हे जेल मध्ये जाईल माझ्या केंद्रात व राज्यात खूप ओळखी आहेत माझ्या नादी लागू नका. एवढेच नव्हे तर खासदार पाटील यांनी आपली धमकी खरी करून दाखवली त्यांनी आमचे विरुद्ध बुलढाणा येथील आर्थिक गुन्हे शाखेत खोटी दबाव आणण्याकरिता तक्रार दाखल केली. तरी खासदार उन्मेष पाटील यांनी व त्यांचे सहकारी यांनी आत्तापर्यंत आमची सुमारे ९.५० ते १० कोटी रुपयाची फसवणूक केलेली आहे. सदरील गुन्हा हा दखलपात्र व गंभीर असून त्यात राजकीय प्रभाव असलेली व्यक्ती तसेच एक चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांच्या विरुद्ध तात्काळ प्रथम माहिती अहवाल नोंदवून घ्यावा. कळावे

संजय शिंनगारे (तक्रारदार)

 

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बचत गटाचे पैशांबाबत विचारणा केल्याने चौघांकडून मारहाण

July 3, 2025
गुन्हे

मद्य परवान्याच्या नावाखाली 9 लाखांची फसवणूक !

July 3, 2025
जळगाव

निवडणुकांसाठी अजित पवार गटाची मोर्चेबांधणी ; प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे उद्या जिल्ह्यात

July 2, 2025
जळगाव

जाणत्या लेखकांकडून नवलेखकांनी सर्जनशीलतेचा वारसा घ्यावा – राहुल भंडारे

July 1, 2025
अमळनेर

अमळनेर तालुक्यातील 11 कृषी केंद्रांची झाडाझडती

July 1, 2025
गुन्हे

निंबादेवी धरणात जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
Next Post

दुष्काळग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १३३ कोटींचे भरघोस अनुदान मंजूर : आमदार मंगेशदादा चव्हाण यांची माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दैवी ! ट्रक आणि टाटा छोटाहत्तीच्या भीषण अपघातात सासू-जावयासह अन्य एक ठार

April 27, 2022

भुसावळात मुस्लीम बहुल भागात घाणीचे साम्राज्य ; तातडीने साफसफाई करण्याची मागणी

October 29, 2020

श्रीराम मंदिर निर्माण अंतर्गत निष्कलंक धाम वडोदा येथे भव्य संत संमेलनाचे आयोजन

January 7, 2021

आक्षेपार्ह पोस्ट मारहाण प्रकरण : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा !

March 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group