जळगाव (प्रतिनिधी) ज्या लोकांनी दूध संघात अपहार केला, गैरव्यवहार केला, त्याच लोकांसोबत सत्ता मिळवण्यासाठी मांडीला मांडी लावून बसणे योग्य नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंना वगळून भाजप आणि शिंदे गट व इतरांनी एकत्र येत ही निवडणूक लढण्याची भूमिका होती. मुक्ताईनगरातून अर्ज दाखल करून एकनाथ खडसेंविरोधात लढणार असून खडसेंनी समोरासमोर येवून लढावं. माघार घेवू नये, असे थेट आव्हान आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले आहे.
जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. यामुळे जळगाव जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले असल्याचे पहायला मिळत आहे. जिल्हा दूध संघावर गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या संचालक मंडळाची सत्ता होती. यापूर्वी ही निवडणूक सर्वपक्षीय झाली होती. आताही ही निवडणूक सर्वपक्षीय होईल, अशी चर्चा होती. मात्र आता निवडणूक एकनाथ खडसे विरुद्ध भाजप होईल असं चित्र निर्माण झालं आहे.
आमदार मंगेश चव्हाण चव्हाण म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी मी ही निवडणूक लढवतो आहे. एकनाथ खडसेंनी सरंजामी पध्दतीने दुध संघाचा कारभार पाहिला होता.अनेकांना त्रास दिला. यामुळे भाजपला ते सोबत नको आहेत. त्यांनी इच्छा असेल तर मी स्वत: त्यांच्या विरोधात लढण्यासाठी तयार आहे. मात्र त्यांनी अर्ज मागे घेऊ नये. ज्या लोकांनी दूध संघात अपहार केला, गैरव्यवहार केला, त्याच लोकांसोबत सत्ता मिळवण्यासाठी मांडीला मांडी लावून बसणे योग्य नाही. त्यामुळे एकनाथ खडसेंना वगळून भाजप आणि शिंदे गट व इतरांनी एकत्र येत ही निवडणूक लढण्याची आमची भूमिका होती. तर आम्ही आमच्या माध्यमातून निवडणुका लढवू आणि जिंकून दाखवू असे, उत्तर एकनाथ खडसे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना दिले आहे.