रावेर प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अभिजीत राऊत पहिल्यांदाच रावेर तालुका दौऱ्यावर आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भा लक्षात घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते रावेर दौऱ्यावर आहेत. वाढत्या संख्येला नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी काय उपाययोजना सुचवितात? याकडे लक्ष लागले आहे.
तसेच तालुक्यातील कापूस खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. मका खरेदी केंद्राची मुदत देखील लवकरच संपणार आहे, मात्र अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी योग्य किंमत मिळत नसल्याने मका विक्री केलेला नाही. त्यामुळे खरेदी केंद्राला मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. जिल्हाधिकारी यांनी या दौऱ्यात तालुक्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे.