मुंबई (वृत्तसंस्था) किरकोळ वादातून मुलानेच बापाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जवळील उचगाव इथल्या मणेर मळ्यात घडली आहे.
कोल्हापूर जवळील उचगाव इथल्या मणेर मळ्यात चंद्रकांत सोनुले हे आपला मुलगा ज्ञानेश्वर सोबत राहतात. दुपारी जेवताना दोघांमध्ये वाद झाला. त्यात ज्ञानेश्वरने कात्रीने आपल्या वडिलांच्या छातीत सपासप वार केल्यामुळे बापाचा जागीच मृत्यू झाला आहे. गांधी नगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.