पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या एकाला संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात सुभाष महादू महाजन (वय ५५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, सुभाष महादू महाजन याने दि. १२ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी ०६.३० वाजेच्या सुमारास २५ वर्षीय महिला उपवास सोडण्यासाठी तिच्या २ वर्षीय मुलीला बघण्यास गेली असता गल्लीतील राहणारा सुभाष महाजन याच्या घरात मुलीचा रडण्याचा आवाज आला. त्यानंतर घरात बघितले असता असता तेव्हा सुभाष महाजन पिडीत मुलीसोबत अश्लील चाळे करत होता. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात सुभाष महादू महाजन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे हे करीत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच संतप्त जमावाने संशयित आरोपी सुभाष महाजनला चांगलाच चोप दिला. या हाणामारीत जखमी झाल्यामुळे त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.