भुसावळ (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज भुसावळ युवक कॉंग्रेसच्या वतीने बेरोजगारीचा निषेध म्हणून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ साजरा केला.
भुसावळ १७ सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने बेरोजगारीचा निषेध म्हणून ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ साजरा केला. मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून करोडो जनतेचे रोजगार गेले आहेत. सामन्या माणसाला त्यांच्या भाषणा शिवाय काही मिळत नसल्यामुळे आज सामान्य जनता हतबल झाली आहे. हाताला काम व पोटाला भाकर मीळत नाही. तशात नोटबंदीने देशाचे आर्थिक नुकसान झाले. तर दुसरीकडे अनेक शासकीय कंपण्याची विक्री करुन खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोदींच्या पंतप्रधानपदाच्या काळात न्यायधीशांना पत्रकार परीषद घ्यावी लागली. तर रोजगार निर्मितीकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष देणे आवश्यक होते. परंतू रोजगार निर्मितीकडे दुर्लक्ष करुन वेगवेगळे वाद निर्माण करणे, माणसात फुट पाडुन भांडणे लावणे, हाच प्रोग्राम सध्या देशात दिसत आहे. करोडो तरुणांची फसवणुक झाल्यामुळे आज देशाचे बारा वाजले आहेत. म्हणून पंतप्रधात नरेद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निषेधात्मक बेरोजगार दिवस साजरा केल्याचे युवक कॉंग्रेसने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. यावेळी युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष ईमरान खान ईद्रीस खान, शहर अध्यक्ष रविंद्र निकम, जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष मुनव्वर खान, प्रदेश संयोजक भगवान मेढे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सलीम गवळी, शहर उपाध्यक्ष विलास खरात, संतोष साळवे, महेंद्र महाले, शहर सरचिटणीस शैलेश अहिरे, सुकदेव सोनवणे, अन्वर तडवी जानी गवळी, महीला जिल्हा सचिव राणी खरात, जिल्हा महिला उपाध्यक्ष हमिदा गवळी, अकिल शहा यांच्यासह आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.