मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंंदे हे (Eknath Shinde Maharashtra new CM) महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेवून याबाबतची मोठी घोषणा केली.
आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आण्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे, भाजपाने हा निर्णय केला, की शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. आज साडेसात वाजता एकनाथ शिंदे यांचा एकट्याचच शपधविधी होईल,” अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना ५६ जागा जिंकली. भाजपला १०५ जागा मिळाल्या. पंतप्रधानांनी भाजपचा मुख्यमंत्री होईल, अशी घोषणा केली. मात्र, तेव्हा निकाल आल्यानंतर तेव्हाचे आमचे मित्र आणि नेते यांनी शब्द फिरवला. विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा अजन्म ज्यांचा विरोध केला, अशा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत युती केली. भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवले. हा जनमताचा अपमान होता.
तसेच गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नवीन विकास योजना नाही. भ्रष्टाचारात २ मंत्री जेलमध्ये जाणे. एकीकडे मा. बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंध ठेवलेल्या मंत्र्यांला पाठिशी घातले. दररोज सावरकरांचा अपमान, हिंदुत्वाचा तिरस्कार झाला. जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव समंत केल्याशिवाय कॅबिनेट घेता येत नाही. ते प्रस्ताव मंजूर केले. ते वैध मानले जाणार नाहीत. पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला तो निर्णय घ्यावाच लागणार आहे असंही फडणवीसांनी सांगितले.
हे सरकार पडलं त्यावेळी महाराष्ट्राला एक पर्यायी सरकार देणं आवश्यक होतं. मी त्याचवेळी सांगितलं होतं हे सरकार चालणार नाही. आम्ही निवडणुका लादणार नाही, हे सांगतलं होतं. म्हणून शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजपचा गट आणि 16 अपक्ष आणि छोट्या पक्षांचा गट सोबत आले आहेत. या सगळयांचे पत्र राज्यपालांना दिले आहे. भाजपने हा निर्णय केला की, आम्ही सत्तेच्या पाठीमागे नाही. ही तत्वांची लढाई, हिंदुत्वाची, विचारांची लढाई आहे.
महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला. एकनाथ शिंदे हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास राजभवनावर दाखल झाले. यावेळी फडणवीस आणि शिंदे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी मोठी घोषणा केली. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये फडणवीस असणार नाहीत, देवेंद्र फडणवीस यांची माहिती. संध्याकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे यांच्या एकट्याचा शपथविधी होणार आहे.