जळगाव (प्रतिनिधी) भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे आज एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात अशोक शिवाजी पाटील नामक व्यक्ती जखमी झाल्याचे कळते. दरम्यान, शेतीच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे शेतीच्या बांधावरून अनेक दिवसापासून एका भाऊबंदकित वाद सुरु होता. आज पुन्हा एकदा बैल गाडी लावण्यावरून हा वाद उफाळून आला. यावेळी एका गटाने चक्क गोळीबार केला. त्यात अशोक शिवाजी पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांना पाठीत गोळी लागली असून त्यांच्यावर जळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या अशोक पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे कळते. तर ही घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. हा हल्ला विजय दोधा पाटील या व्यक्तीने केला असून त्याने तीन ते चार गोळ्या फायर केल्याचे जखमीचे म्हणणे आहे.
















