दत्त नगरात गॅसचा भडका ; जीवितहानी टळल
भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील श्रीराम नगरातील दत्त नगर भागातील रहिवाशी गणेश मिस्त्री यांच्या मुलाचा रात्री वाढदिवस साजरा करत असतांना घरात गॅस सिलेंडरने भडका घेतल्याने परिसरात धावपळ झाली.या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
सविस्तर वृत्त असे की, श्रीराम नगरातील दत्त नगर भागातील घरमालक नितीन इंगळे यांच्या घरातील भागेकरू गणेश मिस्त्री यांच्या मुलाचा सहावा वाढदिवस रात्री साजरा करीत असतांना रात्री ९.४० वाजेच्या सुमारास घरातील गॅस सिलेंडरने अचानक भडका घेतल्याने गणेश मिस्त्री आपल्या जीवाची पर्वा न करता पेट घेतलेले गॅस सिलेंडर घेऊन घराबाहेर फेकले.घटनेची आरडाओरड होताच दत्त नगर मंडळातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन पेटलेले गॅस सिलेंडर विझविले.यामध्ये कुठलेही नुकसान झालेले नसून गणेश मिस्त्री कोरकोळ जखमी झाल्याची माहिती पतीसरतील नागरिकांनी दिली.