रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे जिन्सी या आदिवासी भागातील गावास आज खासदार रक्षाताई खडसे यांनी सदिच्छा भेट देऊन ग्रामपंचायत येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी भाजपा कार्यकर्ते व ग्रामस्थांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करत स्थानिक समस्या जाणून घेतल्या.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह माजी सभापती जितेंद्र पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजयुमो तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस विजय महाजन, संजय महाजन, माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, नथ्थू धांडे, गणेश सेठी, प्रमोद भंगाळे, विनय पवार,अर्जुन जाधव, सरपंच युनूस अयुब तडवी, कर्तार पवार, ग्रा.प.सदस्य अयुब तडवी, चंद्रमणी तायडे, संजू तडवी, सिकंदर तडवी, अलुद्दिन तडवी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.