धरणगाव (प्रतिनिधी) कोरोनामूळे यंदा दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सार्वजनिक स्वरुपात झाला नाही. मात्र जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या माध्यमातून धरणगाव तालूका युवा परिषदेने फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी परिक्षेत तालूक्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या २१ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
फिजीकल डिस्ट्न्स पाळुन हा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढुन पुढिल काळात चांगले यश मिळण्याची उर्जा मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेच पूजन व माल्यार्पण करून झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणेहोळ गावाचे सरपंच रमेश पाटील होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करतांना सांगितले की, आज विद्यार्थी दशेत तूम्ही केलेल्या परिश्रमातून तूमचा सन्मान होत आहे. यातून प्रेरणा घेऊन भविष्यात उज्वल कामगिरी करुन सत्कारास पात्र ठरून गावासह परिसराचे नाव उज्वल करा तसेच विवीध प्रसंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
प्रमूख पाहुणे गावाचे पोलीस पाटील, युवा परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष कु प्रतीक्षा ताई पाटील, युवा परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर सचिव आकाश धनगर आदी उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थित मान्यवरांनी दहावी व बारावीत यश संपादन केलेल्या प्रणाली ठाकूर,ऋषिकेश पाटील, श्रद्धा पाटील ,सायली पाटील, यश पाटील ,गणेश पाटील, मनीषा पाटील ,हेमंत पाटील दिवेश पाटील,नितीन पाटील,चेतन धनगर,प्रशांत पाटील,ललित पाटील,प्रतिज्ञा पाटील,राहुल पाटील,भाग्यश्री पाटील दिनेश पाटील,धवल पवार या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरव केला.
उपक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहूल वाकलकर यांनी पदाधिका-यांना शुभेच्छा दिल्या तर जिल्हाध्यक्षा प्रतिक्षा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वितेसाठी तालूकाध्यक्ष हर्षवर्धन पाटील, तालूका उपाध्यक्ष श्रावण धनगर, तालूका मुख्य सचिव राहुल पाटील, तालूका सचिव आनंद पाटील अनिकेत पाटील अनिकेत सोनवणे, तालूका समन्वयक घनश्याम पाटील निलेश पाटील विजय पाटील चेतन सूर्यवंशी सुधाकर कोळी निलेश संजय पाटील यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुख्य सचिव राहुल पाटील यांनी मानले..