बदलापूर (वृत्तसंस्था) शेजाऱ्यांसोबत झालेल्या क्षुल्लक वादातून एका इसमाला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना वांगणी येथील डोणे गावात घडली आहे. चंद्रकांत पवार या (४८) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
वांगणीपासून काही अंतरावर असलेल्या डोणे येथील विश्वनाथ अपार्टमेंट येथे राहणारे चंद्रकांत पवार यांची २४ वर्षीय मुलगी त्यांच्या संकुलातील सी विंगमध्ये गेल्या आठवड्यात विजेचे बिल घेण्यासाठी गेली होती. यावेळी त्याच संकुलात राहणाऱ्या प्रमिला गुरव यांचा पवार यांच्या मुलीसोबत वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून प्रमिला गुरव यांचा मुलगा निखिल गुरव (२५) १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास, मद्यपान करून चंद्रकात पवार यांच्या घरी गेला होता. या भांडणात निखिलने चंद्रकात पवार यांची पत्नी आणि मुलगी यांना शिविगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आपली पत्नी आणि मुलीचा बचाव करण्यासाठी मध्ये पडलेल्या चंद्रकात पवार यांच्यावर आरोपी निखिलने पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले होते. जखमी झालेल्या चंद्रकांत पवार यांचा बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.