भुवनेश्वर (वृत्तसंस्था) आईवडिलांशी भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात घर सोडून बाहेर पडलेल्या एका १७ वर्षीय मुलीला डांबून ठेवत तिच्यावर सलग २२ दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची भयंकर घटना ओडिशातील कटकमध्ये घडली आहे.
जगतसिंगपूर जिल्ह्यातील तिर्टोल येथील एक १७ वर्षीय मुलगी आईवडिलांशी भांडण झाल्यानंतर घरातून निघून गेली होती. ओएमपी चौकातील बस स्थानकासमोर तिला एक व्यक्ती भेटला. तुला घरी सोडतो म्हणत तिला घेऊन तिर्टोलच्या दिशेने निघाला. मात्र, तिर्टोल जाण्याऐवजी मध्येच तो तिला गतीरौटपटना गावातील एका पोल्ट्री फॉर्मवर घेऊन गेला. आरोपी पिडीत मुलीला तिथे एका खोलीत डांबून ठेवले. त्यानंतर दोन व्यक्तींनी तिच्यावर २२ दिवस अत्याचार केला. ग्रामस्थांना संशय आल्यानंतर याची माहिती पोलिसांना दिली. माहिती कळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी पोल्ट्री फॉर्म धाड टाकली. त्यानंतर अपहरण केलेल्या मुलीची सुटका करण्यात आली. एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, दुसऱ्याचा शोध सुरू केला आहे.