नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: इराणी यांनी ट्वीटरवर याबाबत माहिती दिली आहे.
इराणी यांनी ट्वीटरवर म्हटले की, कोणत्याही प्रकारची घोषणा करताना त्यासंबंधित शब्द शोधणं माझ्यासाठी अवघड आहे. त्यामुळे मी सोप्या शब्दात सांगू इच्छिते. माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लवकरात लवकर कोरोना टेस्ट करावी, असे आवाहन देखील स्मृती इराणी यांनी केले आहे. दरम्यान, स्मृती इराणी गेल्या काही दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकींमध्ये भाजप पक्षाच्या स्टार प्रचारक म्हणून प्रचार करत होत्या.