पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास पुणे महामेट्रोच्या कामाची पाहणी केली.
अजित पवारांनी संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनची पाहणी केली. यावेळी पवारांनी स्टेशनवर तिकीट विक्री कशी असेल याचाही अनुभव घेतला. इतकेच नव्हे तर मेट्रोच्या रुळावर जाऊन काही अंतर प्रवासही केला. शिवाय लॉकडाऊनमुळे पुणे महामेट्रोच्या कामात दिरंगाई आली आहे का? कामगार पोहोचलाय का? यासह अन्य माहिती त्यांनी घेतली. दरम्यान पुणे महामेट्रोच्या कामाची पाहणी करुन अजित पवार पुण्याकडे रवाना झाले असून तिथे ते कोरोना परिस्थितीबाबात आढावा बैठक घेणार आहेत.