मुंबई (वृत्तसंस्था) उर्मिला मातोंडकर… ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही, अशा असभ्य भाषेत अभिनेत्री कंगना रनौत हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तोंडसुख घेतले आहे.
संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान असल्याची तिला (कंगना) कल्पना आहे का? तिने स्वतःच्या राज्यातून सुरुवात केली पाहिजे, अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केली होती. एवढेच नव्हे तर क्या उखाड दोगे, किसके बाप का राज है, अशी भाषा कोणती सुसंस्कृत मुलगी वापरते? तिच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीयच आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण तिला पुरवलेली वाय प्लस सुरक्षा आमच्याच पैशातून आहे. भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली होती. त्यावर कंगनाने उर्मिला मातोंडकर… ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार?” असे कंगना टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.