नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जेएनपीटी, एअर इंडिया, एलआयसी यांचे खासगीकरण करू नका. खासगीकरण झाल्यास अनेकांच्या नोकऱ्या जातील, असे म्हणत खासगीकरणाविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत आवाज उठविला आहे.
खासदार संजय राऊत राज्यसभेत म्हणाले की, जेएनपीटी, एअर इंडिया, एलआयसी यांचे खासगीकरण करू नका, देशाची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे, आता परिस्थिती अशी आहे की आमचा जीडीपी आणि आमची आरबीआयही दिवाळखोर झाली आहे, अशा परिस्थितीत सरकारने एअर इंडिया, रेल्वे, एलआयसी आणि इतर बर्याच ठिकाणी विक्रीसाठी मोठी विक्री आणली आहे. यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा समावेश आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जारी केला. मात्र, त्याने काय साध्य झाले, उलट कोणतेही नियोजन न करता लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली आणि देश आर्थिक संकटात सापडला असल्याची टीका देखील संजय राऊत म्हणालेत.