मेहुणबारे ता. चाळीसगाव (प्रतिनिधी) मेहूणबारेसह जामदे येथे बंद घरे फोडत अज्ञात चोरट्यांनी लाखोंच्या रोकडसह सोने-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मेहुणबारे येथील चोरीत २ लाख ६ हजाराचा ऐवज लंपास
यासंदर्भात पहिली फिर्याद सुरेश अभिमन कोकनदे (रा. नवेगाव,मेहुणबारे) यांनी दिली आहे. कोकनदे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या आत्या विमलबाई पुडंलीक निकम (धनगर) (रा.गल्ली नंबर ४ नवेगाव) ह्या राहते घराला कुलुप १४ ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान, बाहेरगावी गेले होते. याच काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे लोंखडी दरवाजेची कडी व उघडुन आतील लाकडी प्लायवुडचा मुख्य दरवाजाचा कडीकोंयडा व कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूम मधील कपाटाच्या लॉकरमधील १,५०,००० रूपये रोख आणि ५६, ०००हजार रूपयाचे सोने चांदीचे दागिणे त्यात वेल्या, अंगठी, व शिक्के असा एकुण २ लाख ६ हजाराचा ऐवज लंपास केला. पुढील तपास सपोनि विष्णु आव्हाड हे करीत आहेत.
जमादा येथे ७० हजारांच्या मुद्देमालावर केला हात साफ
जमादा ता. चाळीसगाव येथील दुसऱ्या घटनेतही चोरट्यांनी तब्बल ७० हजाराचा ऐवज लंपास केला आहे. रामदास पुंडलिक मिस्तरी हे १४ ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान बाहेरगावी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट व मुख्य लाकडी दरवाजा, दोन नंबर रुमचा दरवाज्यांचे कडीकोंयडे कुलुप तोडुन घरात प्रवेश केला. त्यानंतर दोन नंबर रुममधील गोदरेज कपाटाच्या दरवाजे व लॉकरचे कुलुप तोडून त्यामधील रोख रुपये,सोन्याची चैन अंगठी,नविन नववारी साड्या, बँकेचे पासबुक असा एकूण ७० हजार चोरून नेला आहे. पुढील स.फौ. धर्मराज पाटील हे करीत आहेत.
















