मुंबई (वृत्तसंस्था) गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, दसरा साधेपणाने साजरे करा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र आणि दसरा सण देखील साधेपणाने साजरा करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे. याबाबत परीपत्रकही काढण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.नागरिकांनी सामाजिक भान राखत कोरोनामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला होता. त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. तेच आवाहन मुख्यमंत्र्यांनी नवरात्री आणि दसरा सणादरम्यान ही केले आहे.